मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Clay Pot Water: उन्हाळ्यात माठातील पाणी प्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा!

Clay Pot Water: उन्हाळ्यात माठातील पाणी प्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा!

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 31, 2023 05:25 PM IST

Summer Health Care Tips: कडक उन्हापासून थंडावा मिळवण्यासाठी लोक फ्रीजचे पाणी पितात. पण तुम्हाला माठातील थंडगार पाण्याचे फायदे माहित आहे का? माठातील पाणी प्यायल्याने काय फायदे होतात जाणून घ्या.

उन्हाळ्यात माठातील पाणी पिण्याचे फायदे
उन्हाळ्यात माठातील पाणी पिण्याचे फायदे

Health Benefits of Clay Pot Water: उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण कडक उन्हात थंडावा मिळवण्यासाठी फ्रीजच्या पाण्याला पसंती दिली जाते. फ्रीजचे पाणी पिण्याचे दुष्परिणाम आपल्या सर्वांना चांगलेच माहीत आहेत. पण तरीही उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी आपल्याला थंड पाणी प्यायला आवडते. पण तुम्ही कधी मातीच्या माठातील पाणी पिण्याचे फायदे माहित आहे का? नाही तर आम्ही सांगतोय मातीच्या माठातील पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे. जाणून घ्या.

उन्हाळ्यात मातीच्या माठातील पाणी पिण्याचे फायदे

पाण्याला नैसर्गिकरित्या थंड ठेवते

मातीच्या माठात पाणी ठेवल्याने पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते. मातीच्या माठाच्या पृष्ठभागावर लहान छिद्रे असतात आणि या छिद्रांमधून पाण्याचे लवकर बाष्पीभवन होते. बाष्पीभवन प्रक्रियेमुळे पात्रातील पाण्याची उष्णता नष्ट होण्याची काळजी घेतली जाते, ज्यामुळे पाण्याचे तापमान कमी होते.

नैसर्गिक प्युरिफायर

या दिवसात पाणी शुद्ध करण्यासाठी तुम्हाला बाजारात विविध प्रकारचे प्युरिफायर मिळतील. जरी मातीची भांडी फक्त पाणी थंड करण्यासाठीच वापरली जात नाहीत तर ते नैसर्गिकरित्या शुद्ध करण्यासाठी देखील वापरली जातात.

उष्माघातापासून बचाव होण्यास मदत

उन्हाळ्यात उष्माघात ही एक सामान्य समस्या आहे. मातीच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने सनस्ट्रोक सामना करण्यास मदत होते. कारण मातीचे माठातील पाण्यात भरपूर मिनरल्स आणि पोषक घटक राखून ठेवते आणि त्वरीत रीहायड्रेट होण्यास मदत करते.

मेटाबॉलिज्म बूस्ट करते

मातीच्या भांड्यात ठेवलेले पाणी कोणत्याही प्रकारच्या रसायनांपासून मुक्त असते. मातीच्या भांड्यातील पाणी दररोज पिल्याने चयापचय वाढते. पाण्यात असलेल्या खनिजांमुळे ते पचन सुधारू शकते.

घशासाठी उत्तम

फ्रिजचे थंड पाणी प्यायल्याने घशात खाज आणि खवखव होऊ शकते. पण मातीच्या माठातील पाण्याचे तापमान घशात सौम्य असते आणि त्यामुळे तीव्र खोकला वाढत नाही.

अॅसिडिटी होते दूर

मातीची भांडी नैसर्गिकरित्या अल्कधर्मी असतात. त्यामुळे अॅसिडिटी आणि गॅस्ट्रिकशी संबंधित समस्या दूर राहतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel