मराठी बातम्या  /  Lifestyle  /  World No Tobacco Day 2023: Know The Harmful Diseases Caused By Consuming Tobacco

World No Tobacco Day 2023: या जीवघेण्या आजारांना निमंत्रण देते तंबाखू, आजच सावध व्हा!

तंबाखूमुळे होणारे जीवघेणे आजार
तंबाखूमुळे होणारे जीवघेणे आजार (HT)
Hiral Shriram Gawande • HT Marathi
May 30, 2023 11:01 PM IST

Side Effects of Tobacco: आरोग्यासाठी तंबाखू खाणे हानिकारक असल्याचे माहित असूनही अनेक लोकांना त्याचे व्यसन असते. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जाणून घ्या तंबाखूमुळे कोणते जीवघेणे आजार होऊ शकतात.

Harmful Diseases Caused by Tobacco: जगभरता दरवर्षी ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणजे नो टोबॅको डे (No Tobacco Day) साजरा केला जातो. या दिवशी लोकांना तंबाखू किंवा त्याच्या उत्पादनांवर बंदी घालण्यासाठी किंवा वापर कमी करण्यासाठी जागरूक केले जाते. या दिवसाचा मुख्य उद्देश तंबाखूमुळे होणाऱ्या आरोग्याच्या हानीबाबत लोकांना जागरूक करणे हे आहे. तंबाखूजन्य पदार्थांमुळे कर्करोग, फुफ्फुसाचे आजार, हृदयविकार आणि स्ट्रोक यासारखे गंभीर आजार होतात. चला तर जाणून घेऊया तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, विशेषत: धूम्रपान, कोणत्या प्रकारच्या गंभीर आजारांना आमंत्रण देते.

ट्रेंडिंग न्यूज

उच्च रक्तदाब

तंबाखूजन्य पदार्थ, विशेषतः धूम्रपान तुमचे रक्तदाब वाढवते. हाय ब्लड प्रेशरमुळे रक्तवाहिन्यांच्या भिंती कमजोर होतात आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो.

प्रजनन क्षमतेवर होतो परिणाम

धूम्रपानाची सवय स्त्री आणि पुरुष दोघांच्या प्रजनन क्षमतेसाठी अत्यंत हानिकारक मानली जाते. तंबाखू किंवा सिगारेटच्या सेवनाने प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. याशिवाय पुरुषांनी अधिक धूम्रपान केल्यामुळे त्यांच्या शुक्राणूंमध्ये डीएनए खराब होण्याचा धोका वाढतो.

फुफ्फुसांचे आजार

ज्या व्यक्ती नियमितपणे किंवा जास्त प्रमाणात तंबाखूचे सेवन करतात त्यांना फुफ्फुस किंवा तोंडाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका असतो. धूम्रपानाचा थेट परिणाम फुफ्फुसावर होतो. धूम्रपानाच्या धुरामुळे तुमच्या फुफ्फुसातील अल्व्होलीला नुकसान होते ज्यामुळे फुफ्फुसाचा आजार होतो. त्यामुळे फुफ्फुसाचा कँसर होण्याचा धोकाही वाढतो.

मधुमेह

याचा इन्सुलिनवरही परिणाम होतो, ज्यामुळे इन्सुलिनच्या प्रतिकाराचा धोका वाढतो. तसेच ज्या लोकांना आधीपासून मधुमेह आहे, त्यांनी धूम्रपान केल्याने अनेक गंभीर, गुंतागुंत होण्याचा धोका वाढतो.

हृदय रोग

सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांमधील निकोटीन तुमच्या रक्तवाहिन्या अरुंद करते. ज्यामुळे तुमच्या हृदयाचे ठोके जलद होतात. यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. ज्यामुळे हार्ट अटॅक किंवा ब्लॉकेज होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel