मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Foot Massage: पायांची मालिश केल्याने मिळतात आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या कोणते तेल आहे योग्य

Foot Massage: पायांची मालिश केल्याने मिळतात आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या कोणते तेल आहे योग्य

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 30, 2023 05:07 PM IST

Ayurveda Tips: आपण स्वतःची काळजी घेताना त्वचा आणि केसांवर जास्त लक्ष देतो. पायांकडे सहसा सगळ्यांचे दुर्लक्ष होते. पण पायांची तेलाने मालिश केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.

पायंची मालिश केल्याचे फायदे
पायंची मालिश केल्याचे फायदे

Benefits of Foot Oil Massage: डोकेदुखीची समस्या असो किंवा कोणत्याही प्रकारचा ताण जाणवत असेल, थोड्यावेळ केलेली डोक्याची मालिश सर्व दूर करू शकते. त्वचा किंवा केसांची काळजी या दोन्ही गोष्टींमध्ये आपण कोणतीही कसर सोडत नाही. पण जेव्हा पायांचा प्रश्न येतो तेव्हा त्यांच्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. पायाच्या मसाजच्या बाबतीत बहुतेक लोकांच्या बाबतीत असेच आहे. पण तुम्हाला माहित आहे का की डोके आणि केसांप्रमाणेच पायाच्या मसाजचे देखील काही हेल्थ बेनिफिट्स आहेत. चला जाणून घेऊया याबाबत सविस्तर

पायाच्या मालिशचे फायदे

निद्रानाशची समस्या

झोप न येण्याच्या समस्येला निद्रानाश म्हणतात. जर तुम्हालाही निद्रानाशाचा त्रास होत असेल तर रोज रात्री झोपताना तळव्यांची मालिश करा. पायाच्या तळव्याला मसाज केल्याने शरीराला आराम मिळतो आणि मन शांत होते.

तणाव

चिंता होतात दूरः एखादी व्यक्ती दीर्घकाळ तणावाने घेरलेली असेल तर त्याला डिप्रेशनची समस्या होऊ शकते. अशा वेळी तणाव दूर करण्यासाठी, आपण पायाच्या तळव्याची मालिश केली पाहिजे. तळव्याला मसाज केल्याने तणाव कमी होतो.

पीरियड क्रॅम्पपासून आराम

महिलांच्या पायांच्या तळव्यांना मसाज केल्याने त्यांना मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळतो. याशिवाय असे केल्याने तणाव, थकवा यापासून आराम मिळतो.

ब्लड सर्कुलेशन

आयुर्वेदात रक्ताभिसरण वाढवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे शरीराला मसाज करणे आहे. तळव्यांना मसाज केल्याने संपूर्ण शरीरात ब्लड फ्लो सुधारतो. ब्लड सर्कुलेशन सुधारण्यासाठी पायांच्या तळव्याची मालिश करणे आवश्यक आहे.

सांधेदुखीत आराम

रात्री झोपताना तळव्यांना मसाज केल्याने सांधेदुखीत आराम मिळतो.

कोणत्या तेलाने करावी मालिश?

आयुर्वेदानुसार पायांच्या तळव्याला मसाज करण्यासाठी तिळाच्या तेलाचा वापर करू शकता. या तेलाने शरीराला मसाज केल्याने अनेक समस्या दूर होतात. पण पायांच्या तळव्याला मसाज करण्यासाठी मोहरीचे तेल सर्वात जास्त फायदेशीर आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग