मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  महिलांप्रमाणे पुरुषांनाही येते मासिक पाळी, जाणून घ्या काय असते Male Menstruation

महिलांप्रमाणे पुरुषांनाही येते मासिक पाळी, जाणून घ्या काय असते Male Menstruation

May 30, 2023 09:25 AM IST

What is Male Menstruation: हे जाणून अनेकांना आश्चर्य वाटेल, पण पुरुषांमधील या 'मेल मँस्ट्रुएशन'ला वैद्यकीय भाषेत आयएमएस (IMS) म्हणतात, म्हणजे इरिटेबल मेल सिंड्रोम.

मेल मॅन्स्ट्रुएशन
मेल मॅन्स्ट्रुएशन

Symptoms and Causes of Irritable Male Syndrome in Men: मासिक पाळीचा काळ प्रत्येक स्त्रीसाठी खूप कठीण असतो. या काळात, महिलांना पोटदुखी, ओटीपोटात सूज, एकाग्रता नसणे, मूड बदलणे, जडपणा आणि थकवा यासारखी अनेक लक्षणे जाणवू शकतात. मात्र या काळात महिलांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते हे बहुतांश लोकांना माहिती आहे. पण क्वचितच कोणाला माहीत असेल की स्त्रियांप्रमाणेच पुरुषांनाही 'मेल मॅन्स्ट्रुएशन' (Male Menstruation) सामना करावा लागतो. हे जाणून अनेकांना आश्चर्य वाटेल, पण पुरुषांमधील या 'मेल मॅन्स्ट्रुएशन'ला वैद्यकीय भाषेत IMS म्हणतात, म्हणजे इरिटेबल मेल सिंड्रोम.

काय आहे 'मेल मॅन्स्ट्रुएशन'

खरं तर पुरुषांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी वेळोवेळी वाढत राहते. यामुळे पुरुषांना मासिक पाळीच्या वेळी उदासीनता, थकवा, चिंता, मूड बदलणे इत्यादी लक्षणे जाणवत राहतात. वैद्यकीय संशोधन त्याला मेल पीरियड म्हणतात. एका अभ्यासानुसार, सुमारे २६ टक्के पुरुषांना अशा नियमित 'मेल पीरियड्स'चा अनुभव येतो.

ट्रेंडिंग न्यूज

स्त्रियांच्या पीरियड्सपेक्षा कसे वेगळे असतात 'पुरुषांचे पीरियड्स' :

सामान्यत: पुरुषांमध्ये दिसणारी पीरियड्सची लक्षणे स्त्रियांच्या पीरियड्ससारखीच असतात. फरक एवढाच की पुरुषांना स्त्रियांप्रमाणे रक्तस्त्राव होत नाही. परंतु जर आपण त्याच्या लक्षणांबद्दल बोललो तर ते कधी कधी स्त्रियांप्रमाणे पुरुषांमध्ये देखील दिसतात. या काळात पुरुषांना पोटदुखी, थकवा आणि चिडचिडेपणाचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय त्यांची जेवणाची लालसाही वाढते, म्हणजेच त्यांना वेगवेगळ्या गोष्टी खाव्याशा वाटतात.

पुरुषांचे हार्मोनल चक्र स्त्रियांच्या मासिक पाळीसारखे नसते. पुरुषांमधील हार्मोनल चक्र सामान्यतः टेस्टोस्टेरॉनवर परिणाम करतात. त्यामुळे त्यांच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी सकाळी जास्त आणि रात्री कमी असते. लोक 'मेल पीरियड्स' गांभीर्याने घेत नाहीत हे अनेक तज्ञ मान्य करत असले तरी या विषयावर अजून संशोधनाची गरज आहे.

'मेल मॅन्स्ट्रुएशन' दरम्यान या गोष्टी लक्षात ठेवा

जीवनशैलीतील बदल 'इरिटेबल मेल सिंड्रोम'च्या दुष्परिणामांना सामोरे जाण्यास मदत करू शकतात. 'मेल मॅन्स्ट्रुएशन' दरम्यान पुरुषांमध्ये हार्मोनल बदलांमुळे निर्माण होणाऱ्या तणावाचा सामना करण्यासाठी व्यायाम, सकस आहार, मद्यपान आणि धूम्रपानापासून दूर राहण्याची शिफारस केली जाते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel