मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा पनीर पॉपकॉर्न, नोट करा ही टेस्टी रेसिपी

संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा पनीर पॉपकॉर्न, नोट करा ही टेस्टी रेसिपी

Jan 27, 2023, 05:53 PM IST

    • Evening Snacks Recipe: नेहमीचे स्नॅक्स खाऊन कंटाळा आला आणि काहीतरी वेगळं खायची इच्छा असेल तर ट्राय करा पनीर पॉपकॉर्न. नोट करा ही सोपी आणि टेस्टी आहे ही रेसिपी.
पनीर पॉपकॉर्न

Evening Snacks Recipe: नेहमीचे स्नॅक्स खाऊन कंटाळा आला आणि काहीतरी वेगळं खायची इच्छा असेल तर ट्राय करा पनीर पॉपकॉर्न. नोट करा ही सोपी आणि टेस्टी आहे ही रेसिपी.

    • Evening Snacks Recipe: नेहमीचे स्नॅक्स खाऊन कंटाळा आला आणि काहीतरी वेगळं खायची इच्छा असेल तर ट्राय करा पनीर पॉपकॉर्न. नोट करा ही सोपी आणि टेस्टी आहे ही रेसिपी.

Paneer Popcorn Recipe: जर तुम्ही संध्याकाळच्या चहासोबत काही हेल्दी आणि टेस्टी स्नॅक्स बनवण्याचा विचार करत असाल तर पनीर पॉपकॉर्नची ही टेस्टी रेसिपी ट्राय करा. लहान मुले असोत की मोठे, सर्व वयोगटातील लोकांना हे खायला आवडेल. संध्याकाळची भूक भागवण्यासाठी पनीर पॉपकॉर्न हा एक उत्तम पर्याय असू शकतो. तर मग वाट कशाची पाहत आहात, जाणून घेऊया कशी बनवली जाते ही चविष्ट रेसिपी.

ट्रेंडिंग न्यूज

World Asthma Day 2024: वायू प्रदूषणामुळे वाढतोय दम्याचा त्रास, जाणून घ्या कसे करावे व्यवस्थापन

Parenting Tips: शिक्षण सुधारणांमध्ये सूक्ष्म-शालेय शिक्षणाची भूमिका काय आहे? जाणून घ्या

Summer Essentials: उन्हाळ्यात दिसायचे आहे कूल आणि स्टायलिश? तुमच्याजवळ नक्की ठेवा या ५ प्रकारचे ड्रेस

Mother's Day 2024: यावर्षी कधी आहे मदर्स डे? जाणून घ्या का साजरा केला जातो हा दिवस

पनीर पॉपकॉर्न बनवण्यासाठी साहित्य

- पनीर - २५० ग्रॅम

- बेसन - १ कप

- आले-लसूण पेस्ट - १ टेबलस्पून

- हळद - १/२ टीस्पून

- काश्मिरी लाल तिखट - १/४ टीस्पून

- काळी मिरी - १/४ टीस्पून

- बेकिंग सोडा - १ चिमूटभर

- ब्रेड क्रंब्स - १/२ कप

- ओवा - १/४ टीस्पून

- मीठ - चवीनुसार

पनीर पॉपकॉर्न बनवण्याची पद्धत

पनीर पॉपकॉर्न बनवण्यासाठी सर्वप्रथम पनीरचे तुकडे एका भांड्यात चौकोनी कापून ठेवा. त्यानंतर काश्मिरी लाल मिरची, ओवा, काळी मिरी आणि चवीनुसार मीठ घालून हे मसाले हलक्या हाताने पनीर मध्ये मिक्स करा. आता दुसरे भांडे घ्या. त्यात बेसन, काश्मिरी तिखट, बेकिंग सोडा, हळद आणि आले-लसूण पेस्ट घालून सर्व काही चांगले मिक्स करा. यानंतर या मिश्रणात थोडे थोडे पाणी घालून जाडसर बॅटर तयार करा आणि चांगले मिक्स करा. हे लक्षात ठेवा की पीठ नीट गुळगुळीत आणि गुठगुळी मुक्त असावे. आता या बॅटर मध्ये पनीरचे चौकोनी तुकडे बुडवून ब्रेड क्रंबमध्ये चांगले कोट करा आणि तळून घ्या. पनीर सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. त्याच प्रमाणे सर्व पनीरचे चौकोनी तुकडे तळून घ्या. तुमचे पनीर पॉपकॉर्न तयार आहेत. गरमा गरम सर्व्ह करा.

 

विभाग