मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kabab Recipe: इव्हनिंग स्नॅक्समध्ये बनवा गरमा गरम पालक कबाब, चहाची मजा होईल डबल

Kabab Recipe: इव्हनिंग स्नॅक्समध्ये बनवा गरमा गरम पालक कबाब, चहाची मजा होईल डबल

Jan 17, 2023, 06:00 PM IST

    • Evening Snacks Recipe: संध्याकाळी लागणारी भूक मिटवण्यासाठी चहासोबत काहीतरी चटपटीत खायला अनेकांना आवडते. रोज चहा सोबत बिस्कीट, कुकीज खाऊन कंटाळा आला असेल तर बनवून पहा हे पालक कबाब. झटपट बनणारे हे कबाब इव्हनिंग स्नॅक्ससाठी परफेक्ट आहेत.
पालक कबाब (Freepik)

Evening Snacks Recipe: संध्याकाळी लागणारी भूक मिटवण्यासाठी चहासोबत काहीतरी चटपटीत खायला अनेकांना आवडते. रोज चहा सोबत बिस्कीट, कुकीज खाऊन कंटाळा आला असेल तर बनवून पहा हे पालक कबाब. झटपट बनणारे हे कबाब इव्हनिंग स्नॅक्ससाठी परफेक्ट आहेत.

    • Evening Snacks Recipe: संध्याकाळी लागणारी भूक मिटवण्यासाठी चहासोबत काहीतरी चटपटीत खायला अनेकांना आवडते. रोज चहा सोबत बिस्कीट, कुकीज खाऊन कंटाळा आला असेल तर बनवून पहा हे पालक कबाब. झटपट बनणारे हे कबाब इव्हनिंग स्नॅक्ससाठी परफेक्ट आहेत.

Palak Kabab Recipe: पालकामध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्त्व आहेत, हे सगळ्यांना माहित आहे. पालक खालल्याने इम्युनिटी स्ट्राँग होते. हिवाळ्यात पालकाचे विविध पदार्थ आवडीने खाल्ले जातात. पालकामध्ये सर्व आवश्यक पोषक घटक आहेत, त्यामुळे शरीराला आतून ताकद मिळते. पालकामध्ये प्रोटीन, कार्ब, फायबर, व्हिटॅमिन ए, सी, के१, फॉलिक अॅसिड, लोह आणि कॅल्शियम देखील आढळते. फक्त पालकाची भाजी नाही तर तुम्ही यापासून अनेक चटपटीत रेसिपी बनवू शकता. संध्याकाळी चहासोबत बनवून पहा हे कबाब आणि चहाचा मजा डबल करा.

ट्रेंडिंग न्यूज

International Museum Day 2024: का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि थीम

Egg Kofta Curry: अंडा कोफ्ता करी सोबत बनवा वीकेंड खास, बनवायला खूप सोपी आहे रेसिपी

Beauty Trend: तांदूळ आणि त्याच्या पाण्यापासून बनवलेले हे फेस पॅक होत आहे व्हायरल, तुम्ही ट्राय केले का?

World Hypertension Day 2024: ही आहेत हायपरटेन्शनची सुरुवातीची लक्षणं, व्यवस्थापित करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

पालकाचे कबाब बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

- पालक

- काजू

- जिरे पावडर

- हिंग

- कोथिंबीर

- ओवा

- तेल

- दही

- बेसन

- मीठ

पालकाचे कबाब बनवण्याची पद्धत

पालक कबाब बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊल मध्ये कापलेले रोस्टेड काजू घ्या. त्यात जिरे पावडर, हिंग आणि कोथिंबीर मिक्स करून स्टफिंग तयार करून घ्या. आता एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करा. त्यात हिंग, जिरे आणि ओवा टाका. आता यात चिरलेले पालक टाकून काही मिनीटे शिजू द्या. हे एका ब्लाऊल मध्ये काढून घ्या. आता यात दोन चमचे दही, बेसन आणि चवीनुसार मीठ टाका आणि नीट मिक्स करून घ्या. नंतर हे थोडे मिश्रण हातावर घेऊन याचे गोल करून त्यात स्टफिंग ठेवा आणि पररत कव्हर करत नीट चापट आकार द्या. चपटे गोल कबाब बनवताना स्टफिंग बाहेर निघणार नाही याची काळजी घ्या. आता एका पॅन मध्ये थोडे तेल घेऊन ते गरम करा. नंतर त्यात कबाब ठेवून ते शॅलो फ्राय करून घ्या. छान गोल्डन ब्राऊन रंग आला म्हणजे तुमचे कबाब रेडी आहेत. गरमा गरम सर्व्ह करा. तुम्ही हे चटणी, सॉस, चहा किंवा कॉफी सोबत सर्व्ह करू शकता. कबाब डीप फ्राय करण्यापेक्षा ते शॅलो फ्राय केलेले चांगले लागतात तसेच ते हेल्दी देखील असतात.

 

विभाग

पुढील बातम्या