मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Asthma Day 2024: वायू प्रदूषणामुळे वाढतोय दम्याचा त्रास, जाणून घ्या कसे करावे व्यवस्थापन

World Asthma Day 2024: वायू प्रदूषणामुळे वाढतोय दम्याचा त्रास, जाणून घ्या कसे करावे व्यवस्थापन

May 06, 2024, 11:57 PM IST

    • World Asthma Day 2024: दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस साजरा केला जातो. यावर्षी ७ मे रोजी तो साजरा करताना वायू प्रदूषण आणि दम्याचा संबंध याविषयी जाणून घ्या.
World Asthma Day 2024: Air pollution increases asthma problem, know how to manage it (unsplash)

World Asthma Day 2024: दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस साजरा केला जातो. यावर्षी ७ मे रोजी तो साजरा करताना वायू प्रदूषण आणि दम्याचा संबंध याविषयी जाणून घ्या.

    • World Asthma Day 2024: दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस साजरा केला जातो. यावर्षी ७ मे रोजी तो साजरा करताना वायू प्रदूषण आणि दम्याचा संबंध याविषयी जाणून घ्या.

Air Pollution And Asthma Problem: वायू प्रदूषणाचा दमा असलेल्या लोकांवर लक्षणीय परिणाम होतो. दमा होण्याचे अनेक कारणे असून ते केवळ प्रदूषणामुळेच उद्भवत नसला तरी वायू प्रदूषण हे एक प्रमुख कारण ठरु शकते. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस (world asthma day) साजरा केला जातो. २०२४ मध्ये तो ७ मे रोजी साजरा केला जाणार आहे. या दिनानिमित्त नवी मुंबई येथील मेडिकवर हॉस्पिटल्सचे फुफ्फुसविकार तज्ज्ञ डॉ. शाहिद पटेल यांनी वायू प्रदूषणाचा दम्यावर कसा परिणाम होतो आणि त्याचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी सांगितले.

ट्रेंडिंग न्यूज

Raw Mango Recipe: ट्राय करा कैरीच्या रेसिपी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल

Good Cholesterol: हृदयाचे आरोग्य राखायचे असेल तर अशा प्रकारे शरीरात वाढवा गुड कोलेस्ट्रॉल

CTM Routine: स्किन केअरमध्ये रोज फॉलो करा सीटीएम रुटीन, आठवड्यात चमकेल तुमचा चेहरा

National Memorial Day 2024: का साजरा केला जातो राष्ट्रीय स्मृती दिन? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

वायु प्रदूषण आणि दमा यांच्यातील परस्परसंबंध काय?

प्रदुषकांमुळे होणारा त्रास - ट्रॅफिक एक्झॉस्ट, कारखाने आणि अगदी जंगलातील आगीद्वारे बाहेर पडणारे लहान कण आणि त्यातील वायू हे आपल्या फुफ्फुसांमध्ये प्रवेश करतात. हे प्रदूषक वायुमार्गांना त्रास देतात. त्यांची जळजळ करतात आणि त्यांना अतिसंवेदनशील बनवतात. या अतिसंवेदनशीलतेमुळे दम्याची लक्षणे वाढतात. छातीत घरघर, खोकला, दम लागणे आणि छातीत जडपणा येणे अशी लक्षणे दिसून येतात.

धोका वाढतो - वायू प्रदूषण हे अस्तित्त्वात असलेल्या दम्यासाठी केवळ एक ट्रिगर नाही तर हे त्याच्या विकासासाठी देखील कारणीभूत ठरु शकते. विशेषतः मुलांमध्ये ही समस्या अधिक आढळून येते. फुफ्फुसांच्या विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यात वायु प्रदुषणाच्या संपर्कात आल्याने भविष्यात दम्याचा धोका वाढू शकतो.

एलर्जीस कारणीभूत - दमा आणि एलर्जी असलेल्यांसाठी वायू प्रदूषण अधिक त्रासदायक ठरते. प्रदूषक वायुमार्ग संवेदनशील बनवितात. त्यामुळे ते पराग कण किंवा डस्ट माइट्स सारख्या एलर्जीस अधिक संवेदनाक्षम बनवतात.

वायू प्रदूषणात दम्याचे व्यवस्थापन कसे करावे?

- हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करा. तुमच्या क्षेत्रातील हवेच्या गुणवत्तेबाबत माहिती ठेवा. बातम्यांमधून किंवा इंटरनेटच्या आधारे तुम्हाला हवेच्या गुणवत्तेचे निर्देशांक पाहता येतील.

- जास्त प्रदूषण कालावधीत घराबाहेर पडणे, व्यायाम करणे शक्यतो टाळा. प्रदूषणाची पातळी जास्त असताना घराबाहेर पडून व्यायाम करण्यापुर्वी विचार करा.

- नेहमी मास्कचा वापर करा. घराबाहेर पडताना मास्क वापरायला विसरू नका.

- तुमचे इनहेलर सोबत घ्यायला विसरू नका. आपले इनहेलर नेहमी आपल्यासोबत ठेवा.

- तुमच्या डॉक्टरांशी नियमित संवाद साधा. वायु प्रदूषण आणि दम्याला कारणीभूत असलेल्या तुमच्या चिंतांबद्दल तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा. गरज भासल्यास ते तुमच्या दम्याची औषधे बदलू शकतात.

- सक्रिय जीवनशैली अंगीकारून तुम्ही तुमच्या दम्यावरील वायू प्रदूषणाचा प्रभाव लक्षणीयरीत्या कमी करू शकता. वेळोवेळी तपासणी करा आणि फुफ्फुसविकार तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

पुढील बातम्या