Eye Care Tips: उष्णतेमुळे डोळ्यात जळजळ होते का? आराम मिळवण्यासाठी फॉलो करा हे उपाय-follow these methods to get relief from eye irritation in summer ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Eye Care Tips: उष्णतेमुळे डोळ्यात जळजळ होते का? आराम मिळवण्यासाठी फॉलो करा हे उपाय

Eye Care Tips: उष्णतेमुळे डोळ्यात जळजळ होते का? आराम मिळवण्यासाठी फॉलो करा हे उपाय

May 06, 2024 12:06 PM IST

Eye Irritation in Summer: उन्हाळ्यात अनेकदा डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवतात. विशेषत: या ऋतूत डोळे लाल होतात आणि सूज येण्याबरोबरच जळजळही होते. ही जळजळ कमी करण्यासाठी जाणून घ्या उपाय

Eye Care Tips: उष्णतेमुळे डोळ्यात जळजळ होते का? आराम मिळवण्यासाठी फॉलो करा हे उपाय
Eye Care Tips: उष्णतेमुळे डोळ्यात जळजळ होते का? आराम मिळवण्यासाठी फॉलो करा हे उपाय (unsplash)

Tips to Get Relief From Irritated Eyes: उन्हाळ्याच्या हंगामात तीव्र उन्हामुळे बहुतेक लोकांना डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात. बहुतेक लोकांना या काळात डोळ्यांची जळजळ, खाज आणि डोळे लाल होणे या समस्यांचा सामना करावा लागतो. डोळ्यांच्या थकव्यामुळे काहींना डोळे दुखण्याचाही त्रास होतो. डोळ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काही घरगुती वस्तू वापरू शकता. या पद्धतींचा अवलंब केल्याने तुम्हाला डोळ्यांच्या समस्यांपासून त्वरित आराम मिळेल. उन्हाळ्यात डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी कोणते उपाय करावे हे जाणून घ्या.

१. कोल्ड कॉम्प्रेस

डोळ्यांची जळजळ किंवा एलर्जीशी संबंधित खाज सुटण्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी तुम्ही डोळ्यांवर थंड कापड किंवा आइस पॅक वापरू शकता. याशिवाय डोळ्यांवर थंड पाणी शिंपडू शकता. हे आराम देईल.

२. डोळे धुवा

जर कोणत्याही कणामुळे किंवा धुळीमुळे तुमच्या डोळ्यांना खाज सुटत असेल तर तुम्ही डोळे धुवू शकता. यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करा. यामुळे तात्काळ आराम मिळेल.

३. थंड काकडी लावा

उन्हाळ्यात डोळ्यांची जळजळ शांत करण्यासाठी काकडीचा वापर करा. यासाठी थंड काकडी घ्या. ती धुवून किसून घ्या. आता किसलेली काकडी दोन्ही डोळ्यांवर ठेवा आणि सुमारे १५ ते २० मिनिटे डोळ्यांवर राहू द्या. तुम्ही काकडीचे स्लाइसही रोज डोळ्यांवर ठेवू शकता. याने डोळ्यांना थंडावा मिळतो.

४. गुलाब जल घाला

डोळ्यांत जळजळ आणि खाज येत असेल किंवा डोळे थकले असतील तर गुलाब जल वापरावे. यासाठी गुलाब जलमध्ये कापूस बुडवून डोळ्याभोवती लावा. त्याचे काही थेंबही डोळ्यात टाकू शकता. पण गुलाब जल डोळ्यात टाकण्यापूर्वी त्यात इतर केमिकल नाही याची खात्री करून घ्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner