मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Summer Essentials: उन्हाळ्यात दिसायचे आहे कूल आणि स्टायलिश? तुमच्याजवळ नक्की ठेवा या ५ प्रकारचे ड्रेस

Summer Essentials: उन्हाळ्यात दिसायचे आहे कूल आणि स्टायलिश? तुमच्याजवळ नक्की ठेवा या ५ प्रकारचे ड्रेस

May 06, 2024, 11:04 PM IST

    • Summer Fashion Tips: उन्हाळ्यात तुमचा लूक फ्रेश ठेवायचा असेल तर तुमच्याजवळ या डिझाईनचे ड्रेसेस नक्की ठेवा. यामुळे तुम्ही अगदी सहज कूल आणि स्टायलिश दिसाल.
Summer Essentials: उन्हाळ्यात दिसायचे आहे कूल आणि स्टायलिश? तुमच्याजवळ नक्की ठेवा या ५ प्रकारचे ड्रेस

Summer Fashion Tips: उन्हाळ्यात तुमचा लूक फ्रेश ठेवायचा असेल तर तुमच्याजवळ या डिझाईनचे ड्रेसेस नक्की ठेवा. यामुळे तुम्ही अगदी सहज कूल आणि स्टायलिश दिसाल.

    • Summer Fashion Tips: उन्हाळ्यात तुमचा लूक फ्रेश ठेवायचा असेल तर तुमच्याजवळ या डिझाईनचे ड्रेसेस नक्की ठेवा. यामुळे तुम्ही अगदी सहज कूल आणि स्टायलिश दिसाल.

Dresses to Look Cool and Stylish in Summer: उन्हाळ्यात जर तुम्हाला हवामानानुसार कपडे घालून स्टायलिश दिसायचे असेल, तर या ५ प्रकारच्या ड्रेसेसना नक्कीच तुमच्या वॉर्डरोबचा भाग बनवा. जेणेकरून तुम्ही घरातून बाहेर पडताच लोक तुमच्या स्टाईलची प्रशंसा करतील.  उन्हाळ्यात हेवी ड्रेसेस घालायला फारसे कोणाला आवडत नाही. या काळात हलके आणि कंफर्टेबल कपडे घालण्याकडे लोकांचा कल असतो.  हे ड्रेसेस तुम्हाला गरम उन्हातही कूल आणि स्टायलिश लूक देतील. यांना आपल्या वॉर्डरोबमध्ये ठेवायला विसरू नका. 

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

कफ्तान ड्रेसेस

कफ्तान ड्रेसची गणना अतिशय कंफर्टेबल ड्रेसमध्ये केली जाते. खूप गरम वाटत असेल तर कफ्तान ड्रेस जवळ ठेवा. तुम्ही सुट्टीवर गेला असाल किंवा मित्रांसोबत चित्रपट पाहण्यासाठी कफ्तान डिझाइन कुर्ती किंवा ड्रेस दोन्ही स्टायलिश दिसेल.

चिकनकारी कुर्ता किंवा ड्रेस

चिकनकारी कपडे उन्हाळ्यात खूप आकर्षक दिसतात. तसेच ते कूल आणि एलिगंट लुक देतात. आजकाल चिकनकारी कुर्त्या सोबतच ड्रेसेसही बाजारात उपलब्ध आहेत. हे खरेदी करून तुम्ही ट्रेंडी लुक मिळवू शकता.

शॉर्ट कुर्ती

तुम्हाला ऑफिसमध्ये काही एलिगंट कॅज्युअल लुक हवा असेल तर शॉर्ट कुर्ती हा एक चांगला पर्याय आहे. स्लीव्हलेस, प्रिंटेड शॉर्ट कुर्ती डेनिम किंवा क्रॉप ट्राउझर्ससोबत परफेक्ट दिसेल.

फ्लोरल प्रिंट ड्रेस

जर तुम्हाला ब्रीझी लूक हवा असेल तर सुंदर फ्लोरल प्रिंट ड्रेस जवळ ठेवा. कोणत्याही प्रसंगी हे घातले तर तुम्ही सुंदर दिसाल. या ड्रेसमध्ये तुमचा लूक पूर्णपणे समर सीझनवाला दिसेल.

कॉटन साडी

साड्यांची क्रेझ असेल तर पातळ सुती साडीही जवळ ठेवा. स्लीव्हलेस ब्लाउज किंवा आकर्षक ब्लाउज डिझाइनसह कॉटन साडी पेअर करून ऑफिस मीटिंगला जा. हा लुक कंफर्टेबल आणि परफेक्ट दिसेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

पुढील बातम्या