Kriti Sanon Simple Saree Look: क्रिती सेनन नेहमीच ग्लॅमरस लूकमध्ये दिसते. ज्यामध्ये ती इतकी आकर्षक दिसते की सर्वांच्या नजरा तिच्यावर थांबतात. ती फक्त वेस्टर्न आउटफिट नाही तर साडीमध्येही ती अनेकदा तिचे फिगर फ्लाँट करताना दिसते. पण क्रितीचे काही साडीचे लुक्स आहेत जे मुली सहज कॉपी करू शकतात. प्लेन, प्रिंटेड, शिफॉन फॅब्रिकच्या साड्या पाहिल्यानंतर नक्कीच नेसावेसे वाटेल. तुम्ही सुद्धा हे ट्राय करू शकता.
पांढऱ्या साडीवरची लाल फुले साडीला खास बनवत आहेत. क्रितीने या साडीसोबत प्लेन रेड ब्लाउज मॅच केला आहे. यासोबत क्रितीने गोल्डन ज्वेलरी कॅरी केली आहे. नेकपीस आणि सोनेरी कडा एक साधा आणि एलिगंट लुक देत आहे. तुम्हाला एखाद्या खास प्रसंगी साधा लुक हवा असेल, तर फक्त प्रिंटेड साडीला कॉन्ट्रास्ट ब्लाउजसोबत मॅच करा. यासोबत गोल्डन ज्वेलरी कॅरी करायला विसरू नका.
क्रिती सेननने क्यूट बेबी पिंक साडीसोबत प्रिंटेड गुलाबी ब्लाउज मॅच केला आहे. तर सोबतच गोल्डन आणि कुंदन ज्वेलरी तिचा लुक परफेक्ट करत आहे. एखाद्या खास प्रसंगी तयार व्हायचे असेल, तर प्रिंटेड ब्लाउज प्लेन साडीसोबत मॅच करा. खूप सुंदर दिसाल.
हिवाळ्यात साडी नेसायची असेल तर क्रिती सेसनसारखी स्टायलिश दिसेल. फुल स्लीव्ह वेल्वेट ब्लाउज कोणत्याही स्ट्राइप प्रिंटच्या साडीशी मॅच होऊ शकतो. यामुळे एक क्लासी आणि हटके लुक मिळेल
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या