Bottom Style Mistakes: जवळपास प्रत्येक मुलीला कुर्ती सुंदर दिसते. फिगर कोणतीही असो, साध्या आणि मोहक कुर्तीने संपूर्ण लुक क्लासी बनवता येतो. पण इतर आउटफिट प्रमाणेच त्याचीही स्टाईल योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे. या स्टाईल चुकांची पुनरावृत्ती केल्यास तुम्ही कुर्ती घालूनही सुंदर दिसणार नाही. कुर्ती घालताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. काही साध्या चुका सुद्धा तुमचा पूर्ण लुक खराब करू शकतात. त्यामुळे कुर्ती घालताना या स्टाईल मिस्टेक टाळायचा प्रयत्न करा.
जर तुमची उंची सरासरी असेल आणि तुमची फिगरही पिअर शेपची असेल, तर फ्लेयर्ड पलाझो शॉर्ट कुर्तीसोबत मॅच करू नका. हे मिक्स अँड मॅच तुमचा लुक खराब करू शकते. यामुळे तुमची उंची कमी दिसेल. तसेच तुम्ही आणखी जाड दिसाल. त्यामुळे फ्लेर्ड पलाझो ऐवजी पँट, सिगारेट पँट, प्लेन पलाझो हे तुम्ही कुर्तीसोबत मॅच करू शकता. जेणेकरून तुमची उंची पूर्ण दिसते.
- फक्त कॅज्युअल लूकमध्येच जिन्ससोबत कुर्ता मॅच करण्याची आयडिया चांगली वाटते. त्यामुळे नेहमी साध्या आणि रेग्युलर डिझाइनच्या कुर्ती जीन्ससोबत पेअर करा.
- जीन्ससोबत हेवी कुर्ता किंवा कुर्ती कधीही पेअर करू नका. हे नुसतेच मिस मॅच दिसत नाही तर हेवी कुर्त्या सोबत जीन्सचे कॉम्बिनेशन खास प्रसंगी तुमचा लूक खराब करेल.
- हेवी कुर्त्या सोबत नेहमी मॅचिंग बॉटम वेअर करा. तरच तुमचा लूक सुंदर दिसतो.
- तसेच कुर्त्या सोबत जीन्स पेअर करताना फक्त या दोन प्रकारच्या जीन्स घाला. एक म्हणजे नॅरो फिटेड जीन्स आणि दुसरी म्हणजे क्रॉप फिटेड जीन्स. कुर्ती इतर कोणत्याही डिझाइनच्या जीन्ससोबत फिट बसत नाही आणि लुक खराब करू शकते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या