Blouse Design: पफ स्लीव्ह ब्लाउज घालून सर्वांमध्ये दिसाल हटके, या लुकवरून घ्या टिप्स
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Blouse Design: पफ स्लीव्ह ब्लाउज घालून सर्वांमध्ये दिसाल हटके, या लुकवरून घ्या टिप्स

Blouse Design: पफ स्लीव्ह ब्लाउज घालून सर्वांमध्ये दिसाल हटके, या लुकवरून घ्या टिप्स

Published Jan 03, 2024 09:21 PM IST

Wedding Fashion Tips: या वेडींग सीझनमध्ये तुम्हाला साडी मध्ये उठून दिसायचं असेल तर तुम्ही फुल स्लीव्ह ब्लाउजचे हे डिझाइन ट्राय करु शकता. पफ स्टाइल ब्लाउजमध्ये तुम्हाला हटके लूक मिळले.

पफ स्लीव्ह ब्लाउज डिझाइन
पफ स्लीव्ह ब्लाउज डिझाइन

Full Puff Sleeve Blouse Design: लग्नाचा सीझनमध्ये फॅशन आणि मेकअप आलेच. लग्नामध्ये अनेक मुलींना साडी किंवा ड्रेस, लेहेंगा घालून पारंपारिक लूक करायला आवडतो. जर बहिण, भाऊ किंवा जवळच्या मित्र मैत्रिणीचे लग्न असेल तर साडी आणि लेहेंगाला पहिली पसंती असते. तुमच्या एथनिक लुक्सला आणखी खास बनवणारी गोष्ट म्हणजे स्टायलिश ब्लाउज. याने तुमचा साडीचा लुक आणखी खुलून दिसतो. जर तुम्हाला तुमच्या मित्राच्या किंवा कझिनच्या लग्नात हटके लुक ट्राय करायचा असेल तर हे पफ स्लीव्ह ब्लाउज घालू शकता. हे तुम्हाला अट्रॅक्टिव्ह लूक देईल.

पफ स्लीव्ह ब्लाउज साडीसोबत दिसतो सुंदर

जर तुम्ही साडीसोबत पफ स्लीव्ह ब्लाउज घातला तर तो तुम्हाला अभिनेत्रीसारखा लुक देईल. जुल नेकलाइन असलेले ब्लाउज आकर्षक लुक देतो. सिंपल साडीसोबत तुम्ही पफ स्लीव्ह ब्लाउज घालून ग्रेसफुल दिसू शकता.

प्रिंटेड ब्लाऊज

साडीसोबत कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाउज घालणार असाल तर फुल स्लीव्ह हा प्रकार सुंदर दिसेल.

बिशप स्लीव्ह

तुम्ही लेहेंगा किंवा साडी ब्लाउजसह बिशप स्लीव्ह डिझाइन करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या डिझाईनचा ब्लाउज लांब स्कर्टसोबतही खूप गॉर्जियस लुक देतो.

 

स्क्वेअर शेप नेकलाइनसह

जर तुम्हाला थोडा बोल्ड लूक हवा असेल तर शिल्पा शेट्टीप्रमाणे स्क्वेअर शेप नेकलाइन असलेल्या ब्लाउजमध्ये पफ स्लीव्हज बनवा. हे खूप आकर्षक लूक देईल. तुमच्या आवडीनुसार साडीचा पल्लू कॅरी करण्याचा मार्ग ठरवू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner