मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  इव्हनिंग स्नॅक्स असो वा स्टार्टर बनवा स्ट्रीट स्टाईल व्हेज तंदूरी मोमोज, सोपी आहे रेसिपी

इव्हनिंग स्नॅक्स असो वा स्टार्टर बनवा स्ट्रीट स्टाईल व्हेज तंदूरी मोमोज, सोपी आहे रेसिपी

Dec 16, 2022, 06:27 PM IST

    • Street Style Recipe: आजपर्यंत तुम्ही स्टीम मोमोज, चिकन मोमोज किंवा व्हेज मोमोज असे अनेक प्रकारचे मोमोज खाल्ले असतील. पण तुम्ही कधी स्ट्रीट स्टाइल व्हेज तंदुरी मोमोज ट्राय केलं आहे का?
व्हेज तंदूरी मोमोज

Street Style Recipe: आजपर्यंत तुम्ही स्टीम मोमोज, चिकन मोमोज किंवा व्हेज मोमोज असे अनेक प्रकारचे मोमोज खाल्ले असतील. पण तुम्ही कधी स्ट्रीट स्टाइल व्हेज तंदुरी मोमोज ट्राय केलं आहे का?

    • Street Style Recipe: आजपर्यंत तुम्ही स्टीम मोमोज, चिकन मोमोज किंवा व्हेज मोमोज असे अनेक प्रकारचे मोमोज खाल्ले असतील. पण तुम्ही कधी स्ट्रीट स्टाइल व्हेज तंदुरी मोमोज ट्राय केलं आहे का?

Veg Tandori Momos Recipe: संध्याकाळची छोटीशी भूक भागवायची असो किंवा पार्टीसाठी स्टार्टर असो, सगळ्यांनाच मोमोज खायला आवडतात. आजपर्यंत तुम्ही स्टीम मोमोज, चिकन मोमोज किंवा व्हेज मोमोज सारख्या अनेक प्रकारचे मोमोज चाखले असतील. पण तुम्ही कधी स्ट्रीट स्टाइल व्हेज तंदुरी मोमोज खाल्ले आहेत का? नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्ही ही रेसिपी तुमच्या ख्रिसमस पार्टीच्या स्टार्टर मेनूमध्ये सुद्धा समाविष्ट करु शकता. किंवा घरी होणाऱ्या किटी पार्टीसाठी सुद्धा एक उत्तम डीश आहे. चला तर मग जाणून घेऊया ही टेस्टी व्हेज तंदूरी मोमोजची रेसिपी.

ट्रेंडिंग न्यूज

Dull Skin Care: घाम आणि धुळीमुळे त्वचा निस्तेज झाली का? उपयुक्त ठरेल काकडीचा फेस पॅक

Fitness Mantra: तुमचे वजन जास्त असेल तर करा हे पायांचे व्यायाम, सोपे होईल वेट लॉस

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

व्हेज तंदुरी मोमोज बनवण्यासाठी साहित्य

पिठासाठी लागणारे साहित्य

- दीड कप मैदा

- १/४ टीस्पून मीठ

- १ टीस्पून तेल

- १/२ कप पाणी

स्टफिंगसाठी साहित्य

- २ टीस्पून तेल

- १ लसूण पाकळी बारीक चिरून

- १ गाजर किसलेले

- १/२ कांदा बारीक चिरून

- २ कप किसलेला कोबी

- १/२ टीस्पून काळी मिरी क्रश केलेली

- १/२ टीस्पून मीठ

- कोथिंबीर चिरलेली

तंदूरी मॅरीनेशनसाठी साहित्य

- १/२ कप दही

- १ टीस्पून आले-लसूण पेस्ट

- १/४ टीस्पून हळद

- १ टीस्पून काश्मिरी लाल तिखट

- १/२ टीस्पून गरम मसाला

- १ टीस्पून कसुरी मेथी

- १ टीस्पून लिंबाचा रस

- १ टीस्पून तेल

- चवीनुसार मीठ

व्हेज तंदूरी मोमोज बनवण्याची पद्धत

व्हेज तंदूरी मोमोज बनवण्यासाठी प्रथम नेहमी बनवतात तसेच सर्व साहित्य मिक्स करुन स्टफिंग तयार करा. मोमोजचे पीठ मळून थोडा वेळ बाजूला ठेवा. आता त्या पीठाचे छोटे गोळे घेऊन त्यात स्टफिंग टाकून मोमोज तयार करा. सर्व मोमोज तयार करुन बाजूला ठेवा. एका भांड्यात अर्धा कप दही टाका आणि त्यात एक चमचा आले-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, गरम मसाला, कसुरी मेथी, लिंबाचा रस, तेल आणि मीठ घालून मसाले चांगले मिक्स करा. आता मोमोजला मॅरीनेशनने कोट करा आणि तासभर राहू द्या. एका कढईत दोन चमचे तेल गरम करून त्यात मॅरीनेट केलेले मोमोज घालून मध्यम आचेवर दोन मिनिटे शिजवा, प्रत्येक बाजू चांगली फिरवून घ्या. तंदुरी मोमोजवर चाट मसाला आणि हिरवी कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

 

पुढील बातम्या