मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  बटाटा लव्हर्सला नक्की आवडतील हे बनारसी दम आलू, लंच आणि डिनरसाठी आहेत परफेक्ट

बटाटा लव्हर्सला नक्की आवडतील हे बनारसी दम आलू, लंच आणि डिनरसाठी आहेत परफेक्ट

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 26, 2023 06:55 PM IST

Potato Recipe: बटाट्याचे पदार्थ खायला कोणाला आवडत नाही? स्नॅक्स असो वा भाजी बटाटा विविध पद्धतीने वापरला जातो. तुम्ही दम आलूची भाजी तर अनेक वेळा खाल्ली असेल. पण आज ट्राय करा बनारसी दम आलूची ही रेसिपी.

बनारसी दम आलू
बनारसी दम आलू

Banarasi Dum Aloo Recipe: आपल्या स्वयंपाकघरात कितीतरी भाज्या, पदार्थांची चव बटाट्यामुळे वाढते. मग ती बटाटा मेथीपासून बटाटा वाटाणा, बटाटा कोबी अशी कोणतीही भाजी असो, या भाज्यांसोबत जोडलेला बटाटा त्यांची चव वाढवण्याचे काम करतो. आजपर्यंत तुम्ही बटाट्यापासून बनवलेल्या अनेक रेसिपीज ट्राय केल्या असतील. पण बनारसी दम आलू कधी चाखला आहे का? ही रेसिपी इतर रेसिपीजपेक्षा खूप वेगळी आणि चवदार आहे. चला तर मग, वाट कसली पाहताय, बनारसी दम आलूची ही चविष्ट भाजी कशी बनते ते जाणून घेऊया.

बनारसी दम आलू बनवण्यासाठी साहित्य

- लहान बटाटे - १/२ किलो

- काजू - २ टेबलस्पून

- टोमॅटो चिरून- ४

-क्रीम/मलाई- २ चमचे

- लाल मिरची- ४

- हिरवी वेलची- ४

- कोथिंबीर चिरलेली - १ टेबलस्पून

- जिरे - १ टीस्पून

- बडीशेप - १ टीस्पून

- कसुरी मेथी - १ टीस्पून

- लाल तिखट - १/२ टीस्पून

- आले चिरून - १ इंच

- गरम मसाला - १/२ टीस्पून

- देसी तूप - १ टेबलस्पून

- तेल - तळण्यासाठी

- मीठ - चवीनुसार

बनारसी दम आलू बनवण्याची पद्धत

बनारसी दम आलू बनवण्यासाठी प्रथम बटाटे सोलून स्वच्छ पाण्यात धुवून घ्या. यानंतर, बटाटे कापून घ्या किंवा टूथपिकच्या मदतीने त्यात बारीक छिद्र करा. असे सर्व बटाट्यांना करुन ते एका प्लेटमध्ये वेगळे काढा. आता कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात बटाटे घालून ते सोनेरी तपकिरी होईपर्यंत परतून घ्या. नंतर टिश्यू पेपर असलेल्या प्लेटमध्ये काढा.

आता दुसऱ्या पॅनमध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आणि चिरलेला काजू तळून घ्या. दरम्यान आच मध्यम ठेवून हे मिश्रण ५ मिनिटे भाजून घ्या. आता गॅस बंद करा आणि टोमॅटो मसाला थंड होऊ द्या. यानंतर मिक्सीमध्ये टोमॅटो मसाला टाकून त्याची प्युरी तयार करा. आता कढईत तूप टाकून गरम करा. तूप वितळल्यानंतर त्यात हिरवी वेलची आणि कसुरी मेथी घालून थोडा वेळ भाजून घ्या. यानंतर टोमॅटो प्युरी आणि चवीनुसार मीठ घाला. आता अधूनमधून ढवळत असताना ग्रेव्ही शिजू द्या.

काही वेळाने त्यात दोन वाट्या पाणी घालून ग्रेव्ही उकळण्याची वाट पहा. यानंतर, त्यात तळलेले बटाटे टाका आणि मंद आचेवर पॅन झाकून ठेवा आणि सुमारे १५ मिनिटे शिजू द्या. बनारसी दम आलू बनवताना मध्ये मध्ये ढवळत राहा. त्यात फ्रेश क्रीम आणि गरम मसाला घालून मिक्स करा. एक उकळी आल्यावर गॅसची आच बंद करा. तुमची टेस्टी बनारसी दम आलू रेसिपी तयार आहे. सर्व्ह करण्यापूर्वी चिरलेली कोथिंबीरने गार्निश करा. ही भाजी तुम्ही रोटी, नान किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करू शकता.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या