मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Tandoori Pulao: मुलं भाज्या खायला कंटाळा करत असतील तर बनवा तंदूरी पुलाव, रेस्टॉरंट सारखी टेस्ट देईल ही रेसिपी

Tandoori Pulao: मुलं भाज्या खायला कंटाळा करत असतील तर बनवा तंदूरी पुलाव, रेस्टॉरंट सारखी टेस्ट देईल ही रेसिपी

May 02, 2023, 08:43 PM IST

    • Veg Tandoori Pulao Recipe: रात्रीच्या जेवणात काहीतरी हलकं फुलकं खायची इच्छा असेल तर टेस्टी आणि हेल्दी रेसिपी ट्राय करा. रेस्टॉरंट सारखे व्हेज तंदूरी पुलाव घरीच बनवा. मुलं सुद्धा आवडीने खातील.
व्हेज तंदूरी पुलाव

Veg Tandoori Pulao Recipe: रात्रीच्या जेवणात काहीतरी हलकं फुलकं खायची इच्छा असेल तर टेस्टी आणि हेल्दी रेसिपी ट्राय करा. रेस्टॉरंट सारखे व्हेज तंदूरी पुलाव घरीच बनवा. मुलं सुद्धा आवडीने खातील.

    • Veg Tandoori Pulao Recipe: रात्रीच्या जेवणात काहीतरी हलकं फुलकं खायची इच्छा असेल तर टेस्टी आणि हेल्दी रेसिपी ट्राय करा. रेस्टॉरंट सारखे व्हेज तंदूरी पुलाव घरीच बनवा. मुलं सुद्धा आवडीने खातील.

Restaurant Style Vegetable Tandoori Pulao Recipe: जर तुमची मुले ताटातली भाजी बघून नाक मुरडत असतील तर एखाद्या स्मार्ट मॉम प्रमाणे त्यांच्या आहारात भाज्यांचा समावेश करण्यासाठी त्यांना चविष्ट व्हेज तंदूरी पुलाव बनवून खायला द्या. खायला टेस्टी असण्यासोबतच ही रेसिपीही झटपट तयार होते. इतकंच नाही तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना त्याची चव खूप आवडते. तुम्ही ही रेसिपी लंच किंवा डिनरसाठी कधीही सर्व्ह करू शकता. चला तर मग जाणून घेऊया रेस्टॉरंट स्टाईलमध्ये व्हेज तंदूरी पुलाव कसा बनवायचा.

ट्रेंडिंग न्यूज

Eye Care Tips: उष्णतेमुळे डोळ्यात जळजळ होते का? आराम मिळवण्यासाठी फॉलो करा हे उपाय

Joke of the day : दहा नारळांमधील सात नारळ नासले तर किती शिल्लक राहतील असं जेव्हा गुरुजी विचारतात…

Fitness Mantra: या व्यायामांनी तपासा तुमची फिटनेस लेव्हल, काही मिनिटांत कळेल किती फिट आहात तुम्ही

International No Diet Day: का साजरा केला जातो इंटरनॅशनल नो डाएट डे, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

- १ बटाटा

- १ कांदा

- २ गाजर

- २ कप सोया चंक्स

- १ शिमला मिरची

- २ कप दही

- १/२ टीस्पून लाल तिखट

- १/२ टीस्पून धने पावडर

- १ टीस्पून गरम मसाला

- १ टीस्पून चाट मसाला

- १ टीस्पून मीठ आणि मिरपूड

Mathri Recipe: स्वीट लव्हर्स झटपट बनवा गुळाची मठरी, टेस्टीसोबत हेल्दीही आहे ही रेसिपी

व्हेज तंदूरी पुलाव बनवण्याची सोपी पद्धत

व्हेज तंदूरी पुलाव बनवण्यासाठी आधी तांदूळ धुवून थोडा वेळ भिजवून ठेवा. यानंतर गाजर, बटाटे, कांदे, सोया चंक्स आणि सिमला मिरची कापून वेगळे ठेवा. आता एक बाऊल घेऊन त्यात दही, तिखट, मीठ, मिरपूड, गरम मसाला, धनेपूड आणि चाट मसाला घालून सर्व नीट मिक्स करा आणि ते चिरलेल्या भाज्यांवर ओता. यानंतर भात शिजवा. तांदूळ शिजल्यानंतर मॅरीनेट केलेल्या भाज्या बटर आणि तेलात शिजवा. भाजी शिजली असे वाटल्यावर भातामध्ये टाकून थोडे जास्त शिजवा. तुमचे टेस्टी व्हेज तंदूरी पुलाव तयार आहे. तुम्ही तांदळाच्या फ्लेक्स आणि दही चटणीसोबत सर्व्ह करू शकता.