मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Fruit Juice: अस्थमा रुग्णांसाठी फायदेशीर आहे 'हा' फ्रुट ज्यूस, कसा बनवायचा जाणून घ्या रेसिपी

Fruit Juice: अस्थमा रुग्णांसाठी फायदेशीर आहे 'हा' फ्रुट ज्यूस, कसा बनवायचा जाणून घ्या रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 02, 2023 01:37 PM IST

World Asthma Day: जागतिक दमा दिनानिमित्त दम्याच्या रुग्णांसाठी एक खास रेसिपी शेअर केली जात आहे. जी हेल्दी असण्यासोबतच टेस्टी देखील आहे. सफरचंद, ओवा आणि संत्र्याच्या मदतीने हे फ्रुट ज्यूस बनवले आहे.

दमा रुग्णांसाठी फायदेशीर फ्रुट ज्यूस
दमा रुग्णांसाठी फायदेशीर फ्रुट ज्यूस

Fruit Juice Recipe for Asthma Patients: आज जगभरात 'जागतिक दमा दिन' साजरा केला जात आहे. हा विशेष दिवस दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश हा आहे की, लोकांना अस्थमाच्या आजारापासून बचाव आणि प्रतिबंध याबाबत जागरूकता निर्माण करावी. अशा परिस्थितीत या खास प्रसंगी दम्याच्या रुग्णांसाठी एक खास रेसिपी शेअर केली जात आहे, जी हेल्दी असण्यासोबतच टेस्टी देखील आहे. सफरचंद, ओवा आणि संत्र्याच्या मदतीने हे फ्रुट ज्यूस रेसिपी तयार केली आहे. हे फ्रुट ज्यूस अस्थमाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. चला तर मग वाट कसली पाहताय, जाणून घेऊया कसा बनवला जातो हा चविष्ट फ्रुट ज्यूस.

- २ देठ ओवा (वनस्पती)

- २ संत्री

Yoga Mantra: दम्याच्या रुग्णांनी रोज करावी ही ३ आसनं, श्वासोच्छवासाच्या समस्या होतील दूर

फ्रुट ज्यूस तयार करण्याची पद्धत

अस्थमाच्या रुग्णांसाठी हा फ्रुट ज्यूस बनवण्यासाठी तुम्हाला प्रथम सफरचंद आणि ओव्याचे देठ धुवावे लागतील. यानंतर सफरचंदाचे तुकडे करून घ्या आणि संत्र्याची साल सोलून घ्या. आता हे ज्युसरमध्ये टाका. सोबत ओव्याचे पाने सुद्धा टाका. आता याचा रस काढा. तुमचा चविष्ट फ्रूट ज्यूस तयार आहे. हा ज्यूस एका ग्लासमध्ये काढून सर्व्ह करा.

World Asthma Day 2023: २ मे रोजी साजरा होणार 'जागतिक दमा दिन', जाणून घ्या इतिहास आणि थीम

फ्रुट ज्यूसचे फायदे

हे फ्रुट ज्यूस बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या सफरचंदात फ्लेव्होनॉइड असते, जे दमा पासून प्रतिबंध करून फुफ्फुसांना मजबूत करते. तर ज्यूसमध्ये ओवा टाकल्याने दम्यामध्ये खोकला आणि कफची समस्या दूर होण्यास मदत होते. संत्र्यामध्ये लोह शोषून घेण्याच्या गुणधर्मामुळे ते सर्दी आणि थंडीपासून बचाव करते.

WhatsApp channel