मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Asthma Day: दमा म्हणजे काय? जाणून घ्याची त्याची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

World Asthma Day: दमा म्हणजे काय? जाणून घ्याची त्याची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 02, 2023 10:14 AM IST

World Asthma Day 2023: आज जगभरात जागतिक दमा दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्ताने दम्याचा आजार काय आहे, त्याची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेऊया.

दम्याची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय
दम्याची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

Symptoms and Preventions of Ashtma: जगभरात मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिन (world asthma day) साजरा केला जातो. यावर्षी आज म्हणजेच २ मे रोजी 'जागतिक अस्थमा दिन' साजरा केला जात आहे. हा विशेष दिवस लोकांना दमा म्हणजेच अस्थमापासून बचाव आणि प्रतिबंधाबाबत जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो. या खास प्रसंगी दम्याचा आजार काय आहे, त्याची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेऊया.

ट्रेंडिंग न्यूज

World Asthma Day 2023: २ मे रोजी साजरा होणार 'जागतिक दमा दिन', जाणून घ्या इतिहास आणि थीम

काय आहे दमा 

दमा हा फुफ्फुसांशी संबंधित एक गंभीर आजार असून त्यामुळे रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. वास्तविक दम्यामुळे श्वास नलिकेला सूज आल्याने वायुमार्ग अरुंद होतो. श्वसन मार्गाच्या आकुंचनमुळे श्वास घेण्यास त्रास होणे, श्वास घेताना आवाज येणे, छातीत जडपणा येणे, खोकला यांसारखी लक्षणे रुग्णाला दिसू लागतात. जर पीडित व्यक्तीला दम्यासाठी योग्य उपचार वेळेत मिळाले नाहीत तर परिस्थिती खूप गंभीर होऊ शकते.

- छातीत घट्टपणा, जडपणा जाणवणे.

- श्वास घेण्यास त्रास होणे.

- श्वास घेताना घरघर आवाज येणे.

- थंड हवेत श्वास घेतल्याने स्थिती बिघडते.

Lemon Water: लिंबू पाण्यामुळे होऊ शकते 'हे' नुकसान, रोज पिण्याआधी जाणून घ्या

दम्याची कारणे

आजकाल वाढत्या प्रदूषणामुळे बहुतेकांना दम्याची तक्रार आहे. दमा, सर्दी, फ्लू, धुम्रपान, हवामानातील बदल, एलर्जीयुक्त पदार्थ, ड्रग्ज आणि अल्कोहोलचे सेवन यासोबतच भावनिक ताण यामुळे देखील दमा होऊ शकतो.

दम्यापासून बचावात्मक उपाय

- प्रदूषण टाळण्यासाठी घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क लावा.

- पावसाळ्यात आर्द्रता वाढल्याने संसर्ग होण्याची शक्यताही कायम असते. अशा वेळी स्वतःची काळजी घ्या.

- सूर्यनमस्कार, प्राणायाम, भुजंगासन यासारखे योगासने करून दमा नियंत्रित करता येतो.

Kokum Fruit: इम्युनिटी बूस्ट करण्यासोबत शरीराला थंडावा देते कोकम, उन्हाळ्यातील या सुपरफ्रुटचे हे आहेत फायदे

- अस्थमाच्या रुग्णांनी प्रथिने, कोल्ड ड्रिंक्स, अंडी, मासे, थंड वस्तू, कार्बोहायड्रेटयुक्त गोष्टी कमी प्रमाणात सेवन कराव्यात.

- अस्थमाच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांसह व्हिटॅमिन ए, सी आणि ई असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel