मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: दम्याच्या रुग्णांनी रोज करावी ही ३ आसनं, श्वासोच्छवासाच्या समस्या होतील दूर

Yoga Mantra: दम्याच्या रुग्णांनी रोज करावी ही ३ आसनं, श्वासोच्छवासाच्या समस्या होतील दूर

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 02, 2023 08:16 AM IST

World Asthma Day 2023: अस्थमा रुग्णांसाठी योगासन अतिशय फायदेशीर मानले जाते. अस्थमाच्या रुग्णांना रोज काही योगासने करून आराम मिळू शकतो. चला जाणून घेऊया दम्याच्या रुग्णांसाठी प्रभावी असलेले योगासन.

दम्याच्या रुग्णांसाठी योगासन
दम्याच्या रुग्णांसाठी योगासन

Yoga for Asthma Patient: जगभरात दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी 'जागतिक दमा दिन' साजरा केला जातो. दमा प्रतिबंध आणि नियंत्रणाबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी यावर्षी २ मे रोजी जागतिक दमा दिन साजरा केला जात आहे. वास्तविक दमा हा एक गंभीर आजार आहे, जो फुफ्फुसावर हल्ला करून श्वासावर परिणाम करण्याचे काम करतो. जर एखाद्या व्यक्तीला दम्यासाठी योग्य उपचार वेळेत मिळाले नाहीत तर परिस्थिती खूप गंभीर होऊ शकते.

ट्रेंडिंग न्यूज

मात्र अस्थमाच्या रुग्णांसाठी योग अत्यंत फायदेशीर मानला जातो. अस्थमाच्या रुग्णांना रोज काही योगासने करून आराम मिळू शकतो. चला जाणून घेऊया अशाच काही खास योगासने, ज्यामुळे अस्थमाच्या रुग्णांच्या समस्या दूर होऊ शकतात.

World Asthma Day 2023: २ मे रोजी साजरा होणार 'जागतिक दमा दिन', जाणून घ्या इतिहास आणि थीम

भस्त्रिका

भस्त्रिका केल्याने शरीरात ऑक्सिजनचा संचार चांगला होतो. ज्यामुळे श्वास लागणे किंवा मधूनमधून श्वास घेण्याच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. हे योगासन करण्यासाठी सर्वप्रथम मांडी मारून सरळ बसा. यानंतर शरीराचा कोणताही भाग न हलवता, नाकातून आवाज काढताना श्वास घ्या आणि नंतर आवाज करतच श्वास सोडा. हे आसन रोज सकाळी १ ते ३ मिनिटे केल्याने फायदा होतो.

Yoga Mantra: खांदे आणि हातावरील चरबीची काळजी सोडा, फक्त काही मिनिटं करा ही योगासनं

धनुरासन

धनुरासनाचा दररोजचा सराव दम्याच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. हे आसन करताना व्यक्तीचे शरीर धनुष्यासारखे वाकलेले असते. हे योगासन करताना तुमचे लक्ष तुमच्या श्वासावर केंद्रित करा. हे आसन तुमची फुफ्फुस मजबूत ठेवण्यास मदत करते. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम पोटावर झोपा आणि विरुद्ध दिशेने पाय वाकवून हातांनी धरा. यानंतर छातीचा वरचा भाग वर करून काही काळ या स्थितीत राहा आणि नंतर पूर्वीच्या स्थितीत या. हे करत असताना सतत श्वास आत घ्या आणि सोडत रहा.

Yoga Mantra: हृदयासाठी खूप उपयोगी आहे योग, नक्की करा ही ३ आसनं

अधोमुख श्वानासन

सायनस आणि दम्याने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी अधोमुख श्वानासन देखील एक चांगले योगासन आहे. हे योगासन केल्याने मन शांत राहण्यासोबतच तणावही दूर राहतो. हा योग अस्थमाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel