मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Asthma Day 2023: २ मे रोजी साजरा होणार 'जागतिक दमा दिन', जाणून घ्या इतिहास आणि थीम

World Asthma Day 2023: २ मे रोजी साजरा होणार 'जागतिक दमा दिन', जाणून घ्या इतिहास आणि थीम

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 01, 2023 10:43 PM IST

Asthma Day History: तज्ज्ञांचे म्हणणे आहे की दम्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या लोकांना त्यांच्या आहार आणि जीवनशैलीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. जागतिक दमा दिनानिमित्त जाणून घ्या सविस्तर.

जागतिक दमा दिनाचा इतिहास आणि थीम
जागतिक दमा दिनाचा इतिहास आणि थीम

World Asthma Day 2023 Theme And Significance: जगभरात दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी 'जागतिक दमा दिवस' (world asthma day) साजरा केला जातो. यावर्षी २ मे रोजी वर्ल्ड अस्थमा डे साजरा केला जाणार आहे. हा विशेष दिवस दरवर्षी लोकांना अस्थमा प्रतिबंध आणि बचाव याबाबत जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो.

ट्रेंडिंग न्यूज

Kokum Fruit: इम्युनिटी बूस्ट करण्यासोबत शरीराला थंडावा देते कोकम, उन्हाळ्यातील या सुपरफ्रुटचे हे आहेत फायदे

काय आहे दमा?

दमा हा श्वसनाच्या गंभीर आजारांपैकी एक आहे. हा आजार फुफ्फुसावर हल्ला करून श्वासावर परिणाम करतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दम्यामुळे ज्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे त्यांनी त्यांच्या आहार आणि जीवनशैलीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

Lemon Water: लिंबू पाण्यामुळे होऊ शकते 'हे' नुकसान, रोज पिण्याआधी जाणून घ्या

'वर्ल्ड अस्थमा डे' साजरा करण्याची सुरुवात कशी झाली?

'जागतिक दमा दिन' साजरा करण्याची सुरुवात १९९३ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर अस्थमाने केली होती. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते असा अंदाज आहे की जागतिक स्तरावर ३३९ मिलियन पेक्षा अधिक लोक दम्याने ग्रस्त आहेत तर २०१६ मध्ये जागतिक स्तरावर अस्थमामुळे ४१७,९१८ मृत्यू झाले आहेत.

Gut Health: पचन नीट ठेवण्यासाठी आवश्यक आहे आतड्यांचे आरोग्य, अशा प्रकारे शरीरात वाढवा गुड बॅक्टेरिया

'जागतिक दमा दिन' ची थीम

दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील लोकांमध्ये अस्थमाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी थीम ठरवण्यात आली आहे. जागतिक दमा दिन २०२३ ची थीम 'सर्वांसाठी दम्याची काळजी' (Asthma Care for All) ही आहे. दमा रूग्णांचे जीवनमान वाढवणे आणि सुधारणेयावर लक्ष केंद्रित केले जाईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel