मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Guava Benefits: वजन कमी करण्यासाठी आहारात घ्या पेरू, हृदयही राहील निरोगी

Guava Benefits: वजन कमी करण्यासाठी आहारात घ्या पेरू, हृदयही राहील निरोगी

Jan 26, 2023, 06:51 PM IST

    • Health Care Tips: जर तुम्हाला पेरू खायला आवडत असेल तर काळजी न करता खा आणि त्याचे फायदे देखील जाणून घ्या. वजन कमी करण्यापासून ते हृदयाचे आरोग्य राखण्यापर्यंत पेरू मदत करतो.
पेरू खाण्याचे फायदे (unsplash)

Health Care Tips: जर तुम्हाला पेरू खायला आवडत असेल तर काळजी न करता खा आणि त्याचे फायदे देखील जाणून घ्या. वजन कमी करण्यापासून ते हृदयाचे आरोग्य राखण्यापर्यंत पेरू मदत करतो.

    • Health Care Tips: जर तुम्हाला पेरू खायला आवडत असेल तर काळजी न करता खा आणि त्याचे फायदे देखील जाणून घ्या. वजन कमी करण्यापासून ते हृदयाचे आरोग्य राखण्यापर्यंत पेरू मदत करतो.

Health Benefits of Guava: मौसमी फळांचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला तुमचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर नेहमी सीझनल फळे निवडा. हिवाळ्यात पेरू मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. हे हिरवे पेरू सर्वांनाच आवडतात. पण तुम्हाला माहित आहे का हे पेरू खाल्ल्याने आरोग्याला किती फायदे होतात. याचे फायदे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पेरूच नाही तर त्याच्या पानांमध्येही अद्भुत गुणधर्म आहेत, जे दातदुखी सारख्या समस्यांमध्ये आराम देते.

ट्रेंडिंग न्यूज

Heat Rash In Babies: वाढत्या गरमीमुळे लहान बाळांना घामोळ्या येतायत? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

Weight Loss: वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात? मग, डाएटमध्ये आवर्जून सामील करा पपईच्या बिया! फायदे वाचाच...

Mango Papad: कैरीपासून बनवू शकता आंबट गोड आंब्याचे पापड, झटपट तयार होते सोपी रेसिपी

joke of the day : रक्तदान करून आलेल्या बायकोला जेव्हा नवरा विचारतो की कुठं गेली होतीस…

पेरूमुळे ब्लड शुगर राहते कंट्रोल

संशोधनात असे समोर आले आहे की, पेरू खाल्ल्याने हिवाळ्यात रक्तातील साखर नियंत्रणात राहते. केवळ फळच नाही तर त्याच्या पानांमध्ये इंसुलिन रेसिस्टेंस नष्ट करणारे गुणधर्म असतात, जे रक्तातील साखर नियंत्रित करते.

हृदयाचे आरोग्य निरोगी राहते

पेरूमध्ये भरपूर पोटॅशियम आणि फायबर असते. जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. खराब कोलेस्ट्रॉल हृदयाच्या योग्य कार्यात अडथळा आणते. पेरू खाल्ल्याने हृदय निरोगी राहते.

पचनक्रिया राहते निरोगी

पेरूमध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. जे अन्न पचण्यास मदत करते. अपचन आणि गॅस यांसारख्या समस्यांनी त्रस्त असाल तर हिवाळ्यात पेरू जरूर खा. यामुळे पोट सहज साफ होते.

व्हिटॅमिन सीने समृद्ध

पेरूमध्ये व्हिटॅमिन सी खूप जास्त असते. सर्दीमुळे त्रास होत असेल तर पेरू खाल्ल्याने आराम मिळेल. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती झपाट्याने वाढते.

वजन होईल कमी

पेरू खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. पेरूमध्ये कॅलरी खूप कमी आणि फायबर खूप जास्त आहे. हे खाल्ल्याने पोट स्लिम करण्यासोबत वजन कमी होण्यास मदत होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग