मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Health Care Tips: अनेक समस्यांसाठी सुपरफूड आहे आले, अनेक फायदे देतो लहानसा तुकडा

Health Care Tips: अनेक समस्यांसाठी सुपरफूड आहे आले, अनेक फायदे देतो लहानसा तुकडा

Jan 18, 2023, 04:03 PM IST

    • Use of Ginger: आले हे एक उत्तम सुपरफूड आहे, त्याचा वापर हिवाळ्यात जास्त होतो. याचा उपयोग अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी केला जाऊ शकतो. पहा त्याचे फायदे आणि वापरण्याच्या पद्धती
आल्याचे फायदे आणि वापर करण्याची पद्धत

Use of Ginger: आले हे एक उत्तम सुपरफूड आहे, त्याचा वापर हिवाळ्यात जास्त होतो. याचा उपयोग अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी केला जाऊ शकतो. पहा त्याचे फायदे आणि वापरण्याच्या पद्धती

    • Use of Ginger: आले हे एक उत्तम सुपरफूड आहे, त्याचा वापर हिवाळ्यात जास्त होतो. याचा उपयोग अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी केला जाऊ शकतो. पहा त्याचे फायदे आणि वापरण्याच्या पद्धती

Health Benefits of Ginger: आले ही अशी एक गोष्ट आहे, जी भारतीय घरांमध्ये नेहमीच आढळते. हे अनेक प्रकारे वापरले जाऊ शकते. जेवणाची चव वाढवण्यासोबतच ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. हिवाळ्यात खोकला आणि सर्दी टाळण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. घसादुखीमुळे होणाऱ्या वेदनांपासून मुक्त होण्यासाठी आल्याचा एक छोटा तुकडा पुरेसा आहे. येथे जाणून घ्या त्याचे काही फायदे आणि हिवाळ्याच्या समस्यांना तोंड देण्यासाठी वापरण्याच्या पद्धती.

ट्रेंडिंग न्यूज

Morning Habits: चांगल्या मानसिक आरोग्यासाठी सकाळी करा या गोष्टी, मूड बूस्ट करण्यासाठी आहे बेस्ट

Summer Special Drink: उन्हाळ्यात तुम्हाला थंड ठेवेल मोहब्बत का शरबत, नोट करा रिफ्रेशिंग रेसिपी

joke of the day : माझं वजन कसं कमी होणार असं जेव्हा एक वजनदार महिला डॉक्टरला विचारते…

Kitchen Clean tips: घाम न गाळता किचनमधील चिकट व तेलकट डबे कसे निघणार स्वच्छ? जाणून घ्या सोप्या टीप्स

इम्युनिटी बूस्ट करण्यास उपयुक्त

आले हे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी चमत्कार करू शकते. कोरोनाच्या काळात, जेव्हा प्रत्येक जण रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचा विचार करत होता, तेव्हा आले आणि त्यापासून बनवलेल्या गोष्टी रामबाण उपाय ठरल्या. अशा स्थितीत आता रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.

व्हायरलपासून संरक्षण

अभ्यासानुसार आल्यामध्ये अँटी व्हायरल गुणधर्म आहेत, जे श्वासोच्छवासाच्या विषाणूंशी लढण्यास मदत करतात. मात्र यासाठी तुम्हाला ताजे आले वापरावे लागेल.

सूज आणि खाजेपासून आराम

आल्यामध्ये अँटी इंफ्लामेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे घसा खवखवताना होणाऱ्या वेदना आणि खाज सुटणे यापासून सुटका होऊ शकते. टॉन्सिलिटिसच्या वेदनांमध्ये आले उत्कृष्ट आहे. आले खाल्ल्यानंतर टॉन्सिल्सच्या दुखण्यापासून आराम मिळतो.

आहारात आल्याचा समावेश कसा करावा

चहामध्ये टाका - घसा खवखवणे असो किंवा बंद नाक, या सगळ्यापासून सुटका मिळवण्याचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे चहामध्ये मिक्स करणे. जर तुम्हाला चहा प्यायला आवडत नसेल तर तुम्ही सुंठ सुद्धा टाकून उकळून चहा बनवू शकता.

आल्याची कँडी - तसे तुम्हाला बाजारात अनेक प्रकारच्या कँडी मिळतील, ज्यात आल्याची चव असते. परंतु आपण ते घरी शुद्ध मार्गाने बनवू शकता.

भाजलेल्या आल्यासोबत काळे मीठ - बाजारात कच्चे आले सहज उपलब्ध होईल. ते नीट मध्यम आचेवर भाजून घ्या आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्यात काळे मीठ टाकून खावे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग

पुढील बातम्या