मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Winter Health Care: हिवाळ्यात या लक्षणांकडे दुर्लक्ष नको, असू शकतो टीबीचा धोका

Winter Health Care: हिवाळ्यात या लक्षणांकडे दुर्लक्ष नको, असू शकतो टीबीचा धोका

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 18, 2023 11:15 AM IST

टीबी किंवा क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे. हे बॅक्टेरिया श्वासाद्वारे पसरतात. काही लोक हिवाळ्याच्या दिवसात त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर ते गंभीर रुप धारण करतं. जाणून घ्या याचे लक्षणं आणि प्रतिबंधात्मक उपाय.

टीबीची लक्षणे आणि उपाय
टीबीची लक्षणे आणि उपाय

Symptoms and Prevention of Tuberculosis: टीबी किंवा क्षयरोग हा एक संसर्गजन्य रोग आहे, ज्याचे बॅक्टेरिया श्वासाद्वारे पसरतात. या आजाराचा परिणाम बहुतांशी फुफ्फुसांवर होतो. त्याच्या सर्वात सामान्य लक्षणांमध्ये खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होतो. फुफ्फुसा व्यतिरिक्त शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये होऊ शकते. टीबीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास ते खूप गंभीर असू शकते. अशा परिस्थितीत आम्ही येथे टीबीची सामान्य लक्षणे सांगत आहोत.

ट्रेंडिंग न्यूज

टीबी किंवा क्षयरोगाची लक्षणे

- खोकलताना रक्त येणे

- छातीत दुखणे

- श्वास घेताना आणि खोकलताना वेदना

- वजन कमी होणे

- थंडी वाजणे

- भूक न लागणे

- रात्री घाम येणे

- चक्कर येणे

- ताप

- तीन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला

 

कसा करावा टीबीपासून बचाव

- टीबी रुग्णांच्या संपर्कात येणे टाळा आणि जेव्हाही तुम्ही संपर्कात याल तेव्हा फेस मास्क घाला. नाक स्वच्छ कापडाने झाकून ठेवा. असे केल्याने संसर्ग टाळता येतो.

- खोकताना आणि शिंकताना नाक आणि तोंड टिश्यूने झाका. जेणेकरून बॅक्टेरिया पसरत नाहीत.

- टीबी पॉझिटिव्ह आल्यानंतर औषधे घेणे सुरू करा. तुम्ही घरी किंवा खोलीत असता तेव्हा कफिंग मॅनर्स फॉलो करा.

- पौष्टिकता राखणे खूप महत्वाचेआहे. यासह नियमित तपासणी करत रहा.

- रुग्णाने हवेशीर आणि चांगले प्रकाश असलेल्या खोलीत रहावे. तसेच थंड वारे टाळा. त्यामुळे गर्दीच्या आणि अस्वच्छ ठिकाणी जाणे टाळावे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या