मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Weight Loss: वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात? मग, डाएटमध्ये आवर्जून सामील करा पपईच्या बिया! फायदे वाचाच...

Weight Loss: वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात? मग, डाएटमध्ये आवर्जून सामील करा पपईच्या बिया! फायदे वाचाच...

May 04, 2024, 12:18 PM IST

  • Weight Loss Tips : पपईच्या बिया, ज्यांना लोक निरुपयोगी समजून कचरा म्हणून फेकून दिल्या जातात. पण, त्यात फायबर, हेल्दी फॅट, प्रोटीन, झिंक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.

वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात? मग, डाएटमध्ये आवर्जून सामील करा पपईच्या बिया! फायदे वाचाच...

Weight Loss Tips : पपईच्या बिया, ज्यांना लोक निरुपयोगी समजून कचरा म्हणून फेकून दिल्या जातात. पण, त्यात फायबर, हेल्दी फॅट, प्रोटीन, झिंक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.

  • Weight Loss Tips : पपईच्या बिया, ज्यांना लोक निरुपयोगी समजून कचरा म्हणून फेकून दिल्या जातात. पण, त्यात फायबर, हेल्दी फॅट, प्रोटीन, झिंक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.

benefits of Papaya Seeds: चांगल्या आरोग्यापासून ते सुंदर त्वचेपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही पपईचे अनेक वेळा सेवन केले असेल. पपईमध्ये लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात आढळते, ज्यामुळे आरोग्यास अनेक प्रकारे फायदा होतो. पपईच्या या आरोग्यदायी फायद्यांविषयी बहुतेकांना माहिती आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का की, पपईच्या बिया, ज्यांना लोक निरुपयोगी समजून कचरा म्हणून फेकून दिल्या जातात. पण, त्यात फायबर, हेल्दी फॅट, प्रोटीन, झिंक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. इतकंच नाही तर, त्यात फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि कॅल्शियमसह अनेक खनिजे आढळतात. पपईच्या बियांमध्ये असलेले हे सर्व पोषक घटक लठ्ठपणापासून ते मधुमेहापर्यंतच्या समस्यांवर सहज नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.

ट्रेंडिंग न्यूज

World Hypertension Day 2024: ही आहेत हायपरटेन्शनची सुरुवातीची लक्षणं, व्यवस्थापित करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Mango Shake: उन्हाळ्यात प्या थंडगार मँगो शेक, घरी बनवण्यासाठी फॉलो करा रेसिपी

World Telecommunication Day 2024: जागतिक दूरसंचार दिवस साजरा करण्याचा उद्देश काय? काय आहे यावर्षीची थीम?

joke of the day : मूडमध्ये असलेल्या नवऱ्यानं बनवलेल्या जेवणाला बायकोनं कशी दाद दिली पाहाच!

वजन कमी करणे

जर, तुम्ही तुमच्या वाढत्या वजनामुळे चिंतेत असाल, तर तुमच्या आहारात पपईच्या बियांचा समावेश करा. पपईच्या बियांमध्ये असलेले हाय फायबर वजन झपाट्याने कमी करण्यास मदत करते. याचे सेवन केल्याने पोट बराच काळ भरलेले राहते आणि व्यक्तीला जास्त वेळ भूक लागत नाही. त्यामुळे लठ्ठपणा नियंत्रणात राहतो.

बद्धकोष्ठता

पचनसंस्थेशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी डॉक्टर पपईचे सेवन करण्याचा सल्ला देतात. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल आणि या समस्येपासून लवकर सुटका हवी असेल तर, फक्त पपईच नाही तर त्याच्या बिया देखील फायदेशीर ठरू शकतात. वास्तविक, पपईच्या बियांमध्ये असलेले रेचक गुणधर्म बद्धकोष्ठतेपासून आराम देतात. याशिवाय पपईच्या बियांमध्ये असलेले पपेन नावाचे विरघळणारे फायबर आणि एन्झाइम पोट साफ ठेवून अन्न लवकर पचण्यास मदत करतात. यामुळे पचनक्रिया मजबूत होते.

Mango Papad: कैरीपासून बनवू शकता आंबट गोड आंब्याचे पापड, झटपट तयार होते सोपी रेसिपी

आतड्यांचे आरोग्य सुधारते

पपईच्या बियांमध्ये असलेले कार्पेन नावाचे तत्व आतड्यांतील जंत आणि बॅक्टेरिया मारून बद्धकोष्ठतेपासून आराम देऊन पचनसंस्थेचे आरोग्य सुव्यवस्थित राखते. अनेक मेडिकल रिसर्च रिपोर्टनुसार, पपईच्या बियांमध्ये असलेले प्रोटीओलाइटिक एन्झाइम आतड्यांमध्ये राहणारे बॅक्टेरिया मारतात, ज्यामुळे पोट निरोगी राहते.

मधुमेह

केवळ पपईच नाही तर, त्याच्या बियांचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. पपईच्या बियांमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनशक्ती थोडी मंदावते होते, त्यामुळे रक्तात साखरेचे शोषण कमी होते. सोप्या शब्दात, स्वादुपिंडला इन्सुलिन तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.

Yoga Mantra: सततच्या स्ट्रेसमुळे आरोग्यावर होतो विपरीत परिणाम, टेन्शन फ्री राहण्यासाठी करा ही योगासनं

सूज कमी करते

पपईच्या बिया देखील सूज कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. पपईच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी, अल्कलॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलिफेनॉल्स सारखी अनेक संयुगे असतात. हे सर्व संयुगे दाहक-विरोधी गुणधर्म असणारी आहेत आणि संधिवात इत्यादींमध्ये सूज कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.

पपईच्या बियांचे सेवन कसे करावे?

पपईच्या बियांचे सेवन करण्यासाठी तुम्ही त्याची पावडर स्मूदी, ज्यूस, दलिया इत्यादीमध्ये मिसळून खाऊ शकता. याशिवाय या बिया सकाळी एक ग्लास पाण्यासोबत खाऊ शकतात.

विभाग

पुढील बातम्या