उन्हाळ्याच्या दिवसात बद्धकोष्ठता टाळण्यासाठी अनेकांना पपई आहारात ठेवणे आवडते. काही लोक दुपारी जेवणानंतर पपई खातात, तर काही लोक संध्याकाळी या फळाचा आनंद घेतात. पण तुम्हाला माहित आहे का असे अनेक पदार्थ आहे जे पपईसोबत खाल्ल्याने शरीराला हानी पोहोचू शकते. पपईसोबत काय खाऊ नये ते पाहा.
उच्च प्रथिने - पपईसोबत प्रथिनांचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ न खाणे चांगले, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लक्षात घ्या की शरीरातील प्रथिनांचा अनेक प्रकारे फायदा होतो. अनेक घरांमध्ये रोजच्या आहारात काही प्रमाणात प्रथिनेयुक्त पदार्थ खाल्ले जातात. तथापि हाय प्रोटीन पदार्थ पपईसह खाण्यास मनाई आहे. मासे, मांस, अंडी यांच्याबरोबर पपई खाण्यास मनाई आहे. यामुळे पोट बिघडू शकते.
(Freepik)लिंबू : फिटनेस गुरू मिकी मेहता म्हणतात की, पपईसोबत लिंबू खाऊ नये. दुपारच्या जेवणात सॅलडमध्ये पपई असेल तर त्यात लिंबाचा रस मिक्स करू नका. असे म्हटले जाते की शरीरात हिमोग्लोबिनशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्याचप्रमाणे संत्रा आणि पपई एकत्र खाणे योग्य नाही.
दही - गरमीच्या दिवसात जेवणात दही असते. मात्र दहीसोबत पपई खाऊ नये असं म्हटलं जातं. केवळ दहीच नाही तर पपईसोबत कोणतेही दुग्धजन्य पदार्थ खाणे योग्य नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे पचनाचे विकार होण्याची शक्यता वाढते.
किवी आणि पपई - ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, ते बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी अनेकदा पपई आणि किवीवर अवलंबून असतात. उन्हाळ्याच्या दिवसात शरीर घट्ट राहते आणि बद्धकोष्ठतेची ही समस्या उद्भवते. मात्र मिकी मेहता यांनी किवी आणि पपई एकत्र खाण्यास मनाई केली आहे.
हाय फॅट फूड - पपईबरोबर क्रीम, चीज सारखे जास्त फॅट असलेले पदार्थ खाणे धोकादायक असल्याचे म्हटले जाते! याने पोटादुखी सुरू होऊ शकते. पोट आणि शरीर चांगलं ठेवण्यासाठी जर पपई खात असाल तर चुकीच्या पदार्थासोबत खाल्ल्याने सगळे प्रयत्न शेवटी व्यर्थ होतील. त्यामुळे पपई खाताना या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. (हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा अवलंब करण्यापूर्वी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.)
(Freepik)