Yogasana to Stay Stress Free: बदलेल्या जीवनशैलीमुळे हल्ली प्रत्येक व्यक्ती विविध टेन्शन, स्ट्रेसचा सामना करत आहे. सततची धावपळ, स्ट्रेस याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. फिट राहण्यासाठी शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणे आवश्यक आहे. यासाठी आधी स्ट्रेस फ्री आयुष्य जगता आले पाहिजे. स्ट्रेस, टेन्शन दूर करण्यात योगासन तुमची मदत करू शकता. रोज काही मिनिटे किंवा अर्धा तास केलेले योगासन तुमचे मानसिक आरोग्य सुधारू शकते. जाणून घ्या असे योगासन जे तुम्हाला स्ट्रेस फ्री राहण्यास मदत करतात.
भुजंगासनचा नियमित सराव आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे आसन पाठीदुखी दूर करण्यास, शरीरातील रक्त परिसंचरण सुधारण्यास, मानसिक आरोग्यास चालना देण्यास आणि इतर अनेक समस्यांचा धोका कमी करण्यास मदत करते. याशिवाय शरीराला अनेक प्रकारे लाभ देणारे हे आसन पोटाची चरबी कमी करण्यासोबतच मानसिक शांती मिळवण्यासही मदत करते. हे आसन करण्यासाठी योगा मॅटवर पोटावर झोपा. यानंतर दोन्ही हात छातीच्या बरोबरीने जमिनीवर ठेवून श्वास घेताना, दोन्ही हातांवर भार टाकताना शरीर वर उचला आणि डोके मागे न्या. लक्षात ठेवा हे करताना कंबरेचा खालचा भाग जमिनीवर असावा. या आसनात २० ते ३० सेकंद थांबा. नंतर पूर्व स्थितीत या.
हे आसन शरीरच नाही तर मनही तंदुरुस्त ठेवते. सकाळी हे आसन केल्याने व्यक्ती दिवसभर चार्ज राहतो. सेतू बंधनासन या आसनात शरीर पुलासारखे दिसते. सेतुबंधासन रिकाम्या पोटी करावे. हे सकाळी केल्याने फायदा होतो. जर तुम्हाला हे आसन संध्याकाळी करायचे असेल तर जेवणाच्या ५ किंवा ६ तास आधी करावे, याची काळजी घ्यावी. या आसनामुळे पाठीच्या खालच्या आणि घोट्याच्या, नितंब, पाठीच्या दुखण्यापासून आराम मिळतो. मांड्या आणि खांद्याचा कडकपणा दूर करण्यासाठी प्रभावी. हे आसन करण्यासाठी योगा मॅटवर पाठीवर झोपा. यानंतर दोन्ही पायांवर भार टाकताना पाय गुडघ्यातून वाकवा आणि नितंब वर करा. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हातांनी पायाचा मागचा भाग धरू शकता किंवा बोट एकत्र अडकवा. या स्थितीत असताना १५ ते २० वेळा श्वास घ्या आणि बाहेर टाका. नंतर पूर्व स्थितीत या.
उत्तानासन केल्याने पाठ, नितंब आणि घोट्याच्या वेदना कमी होण्यास मदत होते. यासोबतच शरीरही चांगले ताणले जाते. याशिवाय हे आसन केल्याने तुम्ही तुमचे मन शांत करू शकता आणि तणावापासून दूर राहू शकता. उत्तानासन करण्यासाठी सर्वप्रथम योगा मॅचवर सरळ उभे राहून दीर्घ श्वास घ्या आणि दोन्ही हात वर करा. आता हळूहळू श्वास सोडताना कमरेपासून शरीर खाली वाकवा आणि हातांनी पायाच्या पंज्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. किमान ५० सेकंद या आसनात राहण्याचा प्रयत्न करा. नंतर हात वर करत पूर्व स्थितीत परत या.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)