मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  सावधान! ही फळे एकत्र खाताय? आरोग्यावर होऊ शकतो विपरीत परिणाम

सावधान! ही फळे एकत्र खाताय? आरोग्यावर होऊ शकतो विपरीत परिणाम

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 23, 2023 02:32 PM IST

Health Care Tips: अनेकांना फ्रूट चाट बनवून खाण्याची सवय असते. फळांचे काही कॉम्बिनेशन असे असतात की ते एकत्र खाल्ल्याने आरोग्याला फायदा होण्याऐवजी नुकसान होते. कोणते फळ एकत्र खाऊ नये ते जाणून घ्या.

हे फळं एकत्र खाऊ नये
हे फळं एकत्र खाऊ नये

Fruit Combination Which are Bad for Health: फळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. सफरचंद, केळी, डाळिंब, मोसंबी, द्राक्षे, लिंबू अशी अनेक फळे आहेत, जे खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. फळे खाल्ल्याने अनेक आजारांमध्ये आराम मिळतो. तुम्ही एकाच वेळी अनेक फळे एकत्र करुन खात असाल तर काळजी घ्या. फळांचे काही कॉम्बिनेशन आरोग्याला फायदा करण्याऐवजी नुकसान करतात. ज्यांच्याबद्दल माहित असणे आवश्यक आहे. अनेक लोकांना फ्रूट चाट बनवून खाण्याची सवय असते. अशा परिस्थितीत चुकीच्या फळांचे कॉम्बिनेशन त्यांना आजारी बनवू शकते.

गाजर आणि संत्री

जर तुम्ही फळांचे चाट बनवून खात असाल तर गाजर आणि संत्री एकत्र कधीही खाऊ नका. हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने किडनीवर वाईट परिणाम होतो. संत्री आणि गाजर एकत्र खाल्ल्याने छातीत जळजळ आणि पित्ताचा त्रास होतो.

केळी आणि पेरू

केळी आणि पेरू ही दोन्ही आरोग्यासाठी परिपूर्ण फळे आहेत आणि ती खाल्ल्याने शरीराला फायदा होतो. पण हे दोन्ही एकत्र खाल्ल्यास डोकेदुखीचा धोका असतो. यासोबतच पोटात अॅसिडीटी आणि गॅस तयार होऊ लागतो. म्हणूनच केळी आणि पेरू एकत्र कधीच खाऊ नका.

जर्दाळू आणि डाळिंब

बहुतेकदा लोक फ्रूट चाटमध्ये अगदी शेवटी डाळिंबाचे दाणे घालतात. पण जर तुम्ही फ्रूट चाटमध्ये जर्दाळू खात असाल तर त्यात डाळिंबाचे दाणे मिसळू नका. हे एकत्र खाल्ल्याने पचनास त्रास होऊ शकतो आणि तुम्ही आजारी पडाल.

पपई आणि लिंबू

तज्ज्ञ सांगतात की गोड फळांसोबत आंबट फळे कधीही एकत्र करू नयेत. चवीसाठी लोक फ्रूट चाटवर लिंबाचा रस टाकतात. फ्रूट चाटमध्ये पपई ठेवल्यास त्यासोबत लिंबाचा रस अजिबात घालू नये.

घ्या ही खबरदारी

जर तुम्हाला फ्रूट चाट बनवायची असेल आणि खायची असेल तर नेहमी योग्य कॉम्बिनेशनची फळे एकत्र मिक्स करा. चार ते पाच फळे एकत्र खाऊ नका. टरबूज हे असे फळ आहे जे नेहमी एकटेच खावे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग