मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Health Tips: थंडीत ॲसिडिटी आणि छातीत जळजळचा त्रास होतो? उपयोगी पडतील हे उपाय

Health Tips: थंडीत ॲसिडिटी आणि छातीत जळजळचा त्रास होतो? उपयोगी पडतील हे उपाय

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 17, 2023 06:50 PM IST

Winter Health Care Tips: हिवाळ्यात अनेकदा छातीत जळजळ आणि ॲसिडिटीची समस्या होते. विशेषतः ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्यांना हा त्रास होतो. त्यांनी हे उपाय करून पाहावेत.

ॲसिडिटी आणि छातीत जळजळीचा त्रास कमी करण्यासाठी उपाय
ॲसिडिटी आणि छातीत जळजळीचा त्रास कमी करण्यासाठी उपाय

Heartburn ans Acidity in Winter: थंडीच्या दिवसात बहुतेक लोक छातीत जळजळ आणि ॲसिडिटीच्या समस्येने त्रस्त असतात. ज्यामुळे खाण्यापिण्याची इच्छा होत नाही. काही वेळा काही उपाय करून ही समस्या दूर होऊ शकते. पण काही खाल्ले की पुन्हा छातीत जळजळ सुरू होते. अशा वेळी काही कायमस्वरूपी उपचारांची गरज असते. जर तुम्हाला हिवाळ्यात छातीत जळजळ आणि ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर या पद्धती वापरून पहा.

ट्रेंडिंग न्यूज

जलद चालणे

जर तुम्ही बराच वेळ बसून काम करत असाल तर काही वेळ जलद चालत जा. ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्यांना ही समस्या अनेकदा भेडसावते. त्यामुळे ते आसपासच्या परिसरात वेगाने चालतात. यामुळे ॲसिडिटीमध्ये खूप आराम मिळेल.

चालत चालत बोला

अनेकदा लोक ऑफिसमध्ये एका जागेवर बसून संपूर्ण दिवस घालवतात. जर तुम्हाला जेवल्यानंतर छातीत जळजळ होत असेल तर ऑफिसमध्ये टेक्स्ट किंवा मेसेज करण्याऐवजी तुमच्या सीटवरून उठून सहकाऱ्याशी बोलायला जा. फोनवर बोलायचे असेल तर चालत चालत बोला.

ब्रेकफास्ट

सकाळच्या धावपळीत नाश्ता करणे चुकवू नका. सकाळी जास्त वेळ उपाशी राहिल्याने छातीत जळजळ आणि ॲसिडिटी होते. त्यामुळे काहीतरी नाश्ता नक्की करा.

लंचनंतर लगेच बसून का

जेवल्यानंतर लगेच बसू नका. दहा मिनिटांच्या चालण्याने अन्न पचण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि छातीत जळजळ आणि ॲसिडिटी होणार नाही.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग