मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Weight Loss Tips: तुमच्या लठ्ठपणासाठी या चुकीच्या सवयी तर कारणीभूत नाही ना? लगेच सोडा

Weight Loss Tips: तुमच्या लठ्ठपणासाठी या चुकीच्या सवयी तर कारणीभूत नाही ना? लगेच सोडा

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 17, 2023 04:53 PM IST

Habits that Make you Fat: तुमचे वजन वाढण्याचे कारण काय, याचा कधी तुम्ही विचार केला का? बऱ्याच वेळा तुमच्या काही सवयींमुळे तुमचे वजन वाढू शकते. या चुकीच्या सवयी कोणत्या त्या जाणून घ्या.

लठ्ठपणाला कारणीभूत असलेल्या चुकीच्या सवयी
लठ्ठपणाला कारणीभूत असलेल्या चुकीच्या सवयी

Bad Habits that Lead to Weight Gain: अनेकदा एखादी व्यक्ती कळत नकळत अशा काही चुकीच्या सवयींना आपल्या आयुष्याचा भाग बनवते, ज्या नंतर त्याच्यासाठी त्रासाचे मोठे कारण बनतात. लठ्ठपणा हा तुमच्या अशाच काही चुकांचा परिणाम असू शकतो. जास्त लठ्ठपणा व्यक्तीचे व्यक्तिमत्व तर बिघडवतोच पण तुमचा आत्मविश्वासही कमी करतो. हेच कारण आहे की कोणीही स्वतःला जाड पाहू इच्छित नाही. लठ्ठपणापासून मुक्त होण्यासाठी, लोक व्यायामशाळेत तासनतास घाम गाळण्यापासून ते कठोर डायटचे पालन करतात. परंतु अनेक वेळा समस्या जैसे थेच राहते. मात्र यामागे तुमच्या रोजच्या काही चुकाही कारणीभूत ठरू शकतात. या चुका काय आहेत ते जाणून घेऊया.

ट्रेंडिंग न्यूज

टीव्ही पाहताना जेवण करणे

जे लोक टीव्ही पाहताना नेहमी जेवण करतात, त्यांना आपण किती आणि काय खात आहोत याकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे अनेक वेळा लोक गरजेपेक्षा जास्त खातात. ज्यामुळे वजन वाढण्यासोबत लठ्ठपणा देखील होतो.

जास्त वेळ उपाशी राहणे

जास्त वेळ उपाशी राहिल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. एवढेच नाही तर असे केल्याने मेंदूला योग्य वेळी ग्लुकोज मिळत नाही आणि तुमचा स्वभाव चिडचिड होतो. विज्ञान सांगते की वजन कमी करण्यासाठी जेवण सोडण्याची गरज नाही, तर संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. अभ्यासात असे दिसून आले आहे की दीर्घकाळ उपाशी राहिल्याने लठ्ठपणा येतो. असे केल्याने तुमचे वजन कमी होण्याऐवजी वाढते. कारण या दीर्घकाळात तुमच्या शरीरात चरबी साठू लागते. त्यामुळे तुमच्या पोटाची चरबी वाढते.

लवकर लवकर खाणे

जेवण किंवा अन्न नीट न चावता लवकर लवकर खाण्याच्या तुमच्या सवयीमुळेही लठ्ठपणा येऊ शकतो. असे केल्याने तुमच्या पचनावर परिणाम होतो आणि पोट भरले आहे की नाही याची माहिती मेंदूपर्यंत उशिरा पोहोचते आणि व्यक्ती आवश्यकते पेक्षा जास्त खातो. त्यामुळे लठ्ठपणाची समस्या वाढू लागते.

ब्रेकफास्ट न करणे

रात्रीचे जेवण आणि नाश्ता यामध्ये ८ ते १२ तासांचे अंतर माणसाचे मन आणि स्नायू कमकुवत करण्याचे काम करते. अशा परिस्थितीत सकाळी ऑफिस किंवा शाळेत पोहोचण्याच्या घाईत नाश्ता न करण्याची सवय लठ्ठपणाची समस्या वाढवू शकते.

चांगली झोप न लागणे

रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी लवकर उठणे यामुळेही लठ्ठपणाची समस्या उद्भवते. एवढेच नाही तर एखाद्या व्यक्तीची ही सवय त्याला निद्रानाशाचा बळी देखील बनवू शकते. अशा स्थितीत तुमची सर्व कामे योग्य वेळी करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुम्ही वेळेवर झोपू शकाल आणि जागे व्हाल. दररोज ७-८ तास झोप घेण्याचा प्रयत्न करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग