मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  karnataka Murder case: ‘…यामुळे १० वेळा चाकू भोसकून नेहाला संपवलं, आरोपीची धक्कादायक कबुली

karnataka Murder case: ‘…यामुळे १० वेळा चाकू भोसकून नेहाला संपवलं, आरोपीची धक्कादायक कबुली

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 21, 2024 07:24 PM IST

Karnataka Murder case : कर्नाटकातील नेहा हत्याकांडातील आरोपी फैयाज याने पोलिसांसमोर हत्येचा कारण सांगितले आहे. त्याने म्हटले की, नेहा माझ्याशी बोलत नव्हती. त्यामुळे चाकूने भोसकडून तिची हत्या केली.

नेहा व फैयाज (संग्रहित छायाचित्र)
नेहा व फैयाज (संग्रहित छायाचित्र)

karnataka Murder case : कर्नाटकमध्ये हुबळी येथे (Neha murder case) एका कॉलेज कॅम्पसमध्ये कर्नाटक काँग्रेसच्या नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येनंतर आरोपी फैय्याज याने आपला गुन्हा कबूल केला आहे. आरोपी फैयाज याला अटक करून धारवाड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. आरोपी फैयाज याने पोलिसांसमोर हत्येचा कारण सांगितले आहे. त्याने म्हटले की, नेहा माझ्याशी बोलत नव्हती. त्यामुळे चाकूने भोसकडून तिची हत्या केली. 

ट्रेंडिंग न्यूज

फैयाज याने सांगितले की, घटनेच्या आधीच मी कॉलेज सोडले होते. एका आठवड्यापूर्वी मी कॉलेजमध्ये जाऊन नेहाशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ती मला टाळत होती. १८ एप्रिल रोजी ती परीक्षेसाठी बीवीबी कॉलेजमध्ये आली. त्यादिवशी मी पुन्हा कॉलेजात गेला. परीक्षा संपताच ती क्लासमधून बाहेर आली. मी पुन्हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र ती काहीच बोलली नाही. यामुळे मला राग आला व रागाच्या भरात मी तिच्यावर १० वेळा चाकून प्रहार केला. त्यावेळी मला समजत नव्हते की, काय होत आहे. माझ्यावरचे नियंत्रण गमावले होते. 

२३ वर्षीय मास्टर्स ऑफ कंप्यूटर एप्लीकेशन (MCA) ची विद्यार्थिनी नेहा हिच्या कॉलेजच्या बाहेर हल्ला झाला होता. तिच्याच वर्गात शिकणाऱ्या फैयाज याने तिच्यावर चाकूने हल्ला केला होता. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. 

ते केवळ मित्र होते, प्रेमी नव्हते- 

नेहाचे वडील निरंजन हिरेमठ यांनी सांगितले की, माझी मुलगी खूपच धाडसी व बहादुर होती. आरोपीशी तिचे कोणत्याही प्रकारचे संबंध नव्हते. कॉलेजमध्ये ते केवळ एकमेकांचे मित्र होते. त्यांच्यात प्रेमसंबंध नव्हते. नेहाने त्याला धमकी दिली होती की, त्याने ऐकले नाही तर त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली जाईल. फैयाजसोबत अन्य ४ जण होते. त्यांनी नेहाचा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. 

फैयाजच्या वडिलांनी मागितली माफी -

 नेहाची हत्या करणाऱ्या २३ वर्षीय फैयाजचे वडील सुबानी यांनी पीडित कुटूंबाची माफी मागितली आहे. तसेच आपल्या मुलासा कठोर शिक्षण देण्याची मागणी केली आहे. स्कूल शिक्षक असलेले सुबानी यांनी माध्यमांशी सांगितले की, त्यांनी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता या घटनेबद्दल समजले. आपल्या मुलाच्या कृत्याने त्यांना धक्का बसला आहे. त्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी म्हटले की, आरोपीला अशी शिक्षा द्यावी जेणेकरून भविष्यात असे कृत्या कोणीही करणार नाही. मी होत जोडून नेहाच्या कुटूंबीयांची माफी मागतो. ती माझ्या मुलीप्रमाणे होती. 

सुबानी यांनी म्हटले की, ते गेल्या ६ वर्षापासून पत्नीपासून विभक्त रहात आहे. फैयाज त्याच्या आईसोबत राहतो. पैशाची गरज भासल्यास तो फोन करत असतो. त्यांचे तीन महिन्यापूर्वी मुलाशी शेवटचे बोलणे झाले होते. फैयाजच्या वडिलांनी सांगितले की, जवळपास आठ महिन्यापूर्वी नेहाच्या कुटूंबीयांनी फोन करून माहिती दिली होती की, फैयाज त्यांच्या मुलीला त्रास देत आहे. आपल्या मुलाची चूक कबूल करत त्यांनी म्हटले की, फैयाज आणि नेहा एकमेकांवर प्रेम करत होते. फैयाजने त्यांना सांगितले होते की, ते लवकरच लग्न करणार आहेत. मात्र मी त्याला हात जोडून त्याला नकार दिला होता.

IPL_Entry_Point

विभाग