sky turns green in dubai : संयुक्त अरब अमिरात (UAE)आणि शेजारच्या वाळवंटी प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसाने जन-जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. जगातील सर्वोत्तम शहरांपैकी एक असलेल्या दुबईत सगळीकडे पाणीच पाणी दिसत आहे. दुबईत महापूर आल्यासारखे दृष्य होते. पाऊस इतका मुसळधार होता की, विमानतळावरही पाणी साचले व आंतरराष्ट्रीय उड्डाणे काही वेळांसाठी बंद करावी लागली. दरम्यान दुबईतूनच आता मनात धडकी भरवणारा व्हिडिओ समोर आला आहे.
२३ सेकंदाच्या या व्हिडोतदुबईतील हवामान तेजीने बदलताना दिसत आहे. पाहता पाहता दुबईतील आकाश हिरवं बनतं. ही पोस्ट एक दिवसापूर्वी शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत १.४ लाखाहून अधिक वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. व्हिडिओला जवळपास ७०० लाइक्स मिळाल्या आहेत. यावर लोकांच्या अनेक कमेंटही येत आहेत.
सोशल मीडियावर दुबईतील आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मुसळधार पाऊस आणि वादळादरम्यान आकाशाच रंग बदलून हिरवा होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर काहींनी हे येणाऱ्या वादळाचे संकेत आहेत असं म्हटलं आहे.
एका एक्स यूजरने लिहिले की, खूपच आश्चर्यकारक हवामान. एका अन्य युजरने म्हटले की कदाचित क्लाउड सीडिंगचे काही वाईट परिणाम झाले आहेत. हिरव्या रंगाचा अर्थ गारपीट, वादळ किंवा दोन्ही होतो. एका युजरने लिहिले की, हे इतके भीतीदायक आहे की, वाटते जग नष्ट होणार आहे.
मागील वर्षी फॉक्स न्यूज द्वारे प्रकाशित एका आर्टिकलनुसार,असे तेव्हा होते जेव्हाआकाशात पसरलेला प्रकाश ढगातील बर्फाच्या कणांवर पडल्यानंतर असे दिसते. हेस्टिंग्स,नेब्रास्का मध्ये राष्ट्रीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की,खूप खोली आणि पाण्याचे प्रमाण असलेल्या वादळाच्या ढगांमधील पाण्याचे/बर्फाचे कण प्रामुख्याने निळा प्रकाश पसरवतात. जेव्हा वातावरणात विखुरलेला लालसर प्रकाश ढगातील निळ्या पाण्याच्या/बर्फाच्या थेंबाला प्रकाशित करतो तेव्हा ते हिरवे होतात. रिपोर्टमध्ये वादळ निर्मितीचा निळ्या आणि हिरव्या ढगांशी नेमका काय संबंध आहे हे स्पष्ट होत नसल्याचंही सांगण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या