मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बाप रे..! भरधाव कारच्या धडकेत दोन मुली हवेत उडून रस्त्यावर आपटल्या, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

बाप रे..! भरधाव कारच्या धडकेत दोन मुली हवेत उडून रस्त्यावर आपटल्या, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 22, 2024 05:11 PM IST

Mumbai Road Accident : मुंबईतील गावदेवी परिसरात झालेल्या एका अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दिसते की, रस्ता ओलांडणाऱ्या दोन मुलींना भरधाव कारने उडवले.

भरधाव कारच्या धडकेत दोन मुली हवेत उडून रस्त्यावर आपटल्या, पाहा VIDEO
भरधाव कारच्या धडकेत दोन मुली हवेत उडून रस्त्यावर आपटल्या, पाहा VIDEO

एका अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ही व्हिडिओ मुंबईतील (Mumbai Road Accident)असल्याचे समोर आले आहे. भरधाव कारने उडवल्यामुळे दोन मुली गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, अनेक लोक रस्ता ओलांडत आहेत. दरम्यान,दोन मुली रस्ता ओलांडत असताना दुसऱ्या लेनमधून विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव कारने मुलींनाजोरदार धडक दिली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून या अपघाताचा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ (Accident Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

हा अपघातमुंबईतील गावदेवी परिसरात घडल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत दिसते की, काही लोक रस्ता ओलांडत आहेत. दरम्यान,दोन मुली आणि एक मुलगा रस्ता ओलांडू लागतात.

मुली रस्ता ओलांडताना थोड्या पुढे जाताच समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांना जोराची धडक दिली. ही धडक इतकी इतकी भीषण होती की, दोन मुली थेट हवेत उडाल्या व रस्त्यावर पडल्या.

या अपघातात मुलींच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऐशानी जाधव (१४) आणि जान्हवी कनोजिया (१४) अशी जखमी मुलींची नावे आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. मुलींना धडक दिल्यानंतर रस्त्यात मुली निपचिप पडल्याचे पाहून कारचालक फरार झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे.

दोन्ही मुलींना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. बालहक्क संरक्षण आयोगानेही या घटनेची दखल घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या सुशीबेन शहा यांनी जखमी मुलींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

IPL_Entry_Point