Mother killed her two sons in Raigad : रायगड जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी घटना उघकडीस आली आहे. काही दिवसापूर्वी दोन लहान मुलांचा गूढरित्या मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यूचा उलगडा झाला आहे. प्रेमात अडसर ठरत असल्याने आईनेचे आपल्या पोटचा दोन मुलांचे तोंड दाबून त्यांची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
शीतल पोळ (वय २५) असे आरोपी आईचे नाव आहे. या प्रकरणी मुलांचे वडील सदानंद पोळ यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३१ मार्चला रायगडमध्ये एका घरात ५ आणि ३ वर्षांच्या मुलांचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी मुलांचे वडील सदानंद पोळ यांनी पोलीसांत तक्रार दिली होती. सदानंद पोळ हे घरी आले असता त्यांना त्यांची दोन्ही मुले ही घरात बेशुद्धावस्थेत आढळले होते. पोळ यांनी त्यांना अलिबाग येथील सिव्हिल रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार मांडवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे रुग्णालयात आले. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केल्यावर त्यांना संशय आला. त्यांनी मुलांच्या वडिलांचा जबाब घेतला. यावेळी त्यांनी सांगीतले की, ३१ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता आठवडे बाजारात खरेदी करण्यासाठी पोळ गेले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या मुलांसाठी मिठाई आणि चॉकलेट आणले होते. तर मुलीसाठी चपला देखील विकत आणल्या होत्या.
सदानंद घरी आले असता, त्यांची आई शीतल ही अंगणात काम करत होती. सदानंद यांनी मुलांबाबत विचारले असता, दोन्ही मुले ही ६ वाजल्यापासून घरात झोपली असल्याचे सांगीतले. दरम्यान, पोळ बाहेर गेल्यापासून घरी कुणी आले देखील नव्हते. त्यांनी घरात जाऊन मुलांना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते न उठल्याने त्यांनी तातडीने त्यांना अलिबाग येथे दवाखान्यात आणले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतदेहांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. तेव्हा त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे पुढे आले.
पोलिसांनी वडील सदानंद आणि आई शीतल यांची चौकशी केली. मात्र, त्यांच्याकडून काहीही समजले नाही. पोलिसांनी दोघांच्या वैवाहिक जीवनाबाबत माहिती घेतली. पोलिसांनी शीतलच्या कॉल डिटेल्स रेकॉर्ड तपासले यात शीतल यवतमाळ येथील साईनाथ जाधव याच्यासोबत बोलत असल्याचे आढळले. पोलिसांनी दोन पथकं यवतमाळ आणि हिंगोलीकडे तपास करण्यासाठी पाठवले. दरम्यान, शीतलचे आई-वडील व साईनाथ जाधव यांना चौकशीसाठी मांडवा येथे आणण्यात आले. यावेळी महिला पोलीस अधिकाऱ्यांनी शीतलची वारंवार चौकशी केली. दरम्यान पोलिसांनी तिला हिसका दाखवल्यावर तिनेच मुलांचा खून केला असल्याचे कबूल केले.
शीतलचे आणि साईनाथचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. शीतलला साईनाथ सोबत पळून जायचे होते. मात्र, दोघेही मुले तिच्या मध्ये अडथळा ठरत होती. यामुळे तिने दोघांचा खून करण्याचे ठरवले. दोघेही मुले झोपली असताना तिने टॉवेलने मुलांचे तोंड आणि नाक दाबून त्यांची हत्या केल्याचे कबूल केले.