Dead rat found in ice in Pune Junnar : पुण्यात पिंपरी-चिंचवड येथे समोशात कंडोम (Condom In Samosa) आणि दगड आढळला होता. ही घटना ताजी असतांना आता बर्फाच्या लादीत मेलेला उंदीर आढळल्याने खळबळ उडाली आहे. या वाढत्या घटनांमुळे पुणेकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच पुण्यात (Pune News) नेमकं चाललय काय असा प्रश्न देखील आता उपस्थित होऊ लागला आहे. या सोबतच अन्न आणि औषध प्रशासन विभाग नेमकं काय करत आहे, असा सवाल देखील पुणेकर विचारत आहेत.
राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात तापमान वाढले आहे. या वाढत्या उन्हा पासून संरक्षण करण्यासाठी नागरिक उसाचा रस, शीतपेय, बर्फाचा गोळा, फळांचे रस, किंवा सरबत अशा गोष्टी विकत घेऊन पितात. मात्र आता या पुढे या थंड पदार्थांचे सेवन करतांना विचार करावा लग्न आहे. या गोष्टी थंड ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बर्फाच्या लादीत मेलेला उंदीर आढळला आहे. जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील हा प्रकार आहे.
त्यामुळे आता कडाक्याच्या उन्हात बर्फ टाकून बनवलेले शितपेय पितांना सावध राहण्याची गरज आहे. बेल्हे येथे विक्री करण्यात येणाऱ्या एका बर्फाच्या लादीत हा मेलेला उंदीर आढळला आहे. हाच बर्फ टाकून अनेक ठिकाणी ग्राहकांना सरबत,गोळा, ऊसाचा रस अशी पेय देण्यात येत असल्याने त्यांचा आरोग्याशी खेळ होत असल्याहचे सिद्ध झाले आहे.
बर्फाचा दर्जावर अनेकवेळा चर्चा झाल्या आहेत. अनेक वेळा दूषित पाण्याने हा बर्फ तयार करण्यात येत असल्याच्या अनेक घटना पुढे आल्या आहेत. त्यानंतर यांना दुजोरा देणारी ही घटना पुढे आल्याने असा बर्फ तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई कधी होणार असा सवळ आता विचारला जाऊ लागला आहे. उंदीर सापडलेला हा बर्फ निघोज येथील एका आईस फॅक्टरीमधून बर्फ विक्रीसाठी येतो. हा बर्फ जिथे साठवणूक केला जातो तिथे हा उंदीर आला असेल असे विक्रेत्याने म्हटले आहे. बर्फात उंदीर आढळल्यानंतर बर्फ फेकून दिल्याचे विक्रेत्याने सांगितले.