मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Fitness Tips: सकाळच्या या सवयी पोटाची चरबी कमी करण्यास करतील मदत, वजनही होईल कमी

Fitness Tips: सकाळच्या या सवयी पोटाची चरबी कमी करण्यास करतील मदत, वजनही होईल कमी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 30, 2024 10:04 AM IST

Weight Loss Tips: दररोज सकाळच्या रुटीनमध्ये या काही सवयींचा समावेश करून वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवता येते. तसेच पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. जाणून घ्या कोणत्या आहेत या मॉर्निंग हॅबिट्स

वजन आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी सकाळच्या सवयी
वजन आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी सकाळच्या सवयी (unsplash)

Morning Habits for Belly Fat: लोक अनेकदा वेट लॉसबद्दल चिंतित असतात. पण योग्य नियोजनाशिवाय त्यांचे वजन कमी होत नाही. अशा परिस्थितीत कोणते रुटीन फॉलो केले पाहिजे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जे वजन कमी करण्यास आणि पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करते. कारण अनेक डाएट फॉलो करूनही पोटाची चरबी कमी होत नाही. अशा स्थितीत सकाळच्या या काही सवयी तुमच्या पोटाची चरबी आणि वजन दोन्ही झपाट्याने कमी करण्यास मदत करतील. जाणून घ्या कोणत्या आहेत या सकाळच्या सवयी

सकाळी उठून पाणी प्या

सकाळी लवकर उठल्याने आरोग्य चांगले राहतेच पण स्लिम आणि फिट राहण्यासही मदत होते. सुमारे एक लिटर पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. रात्रभर पोट रिकामे राहिल्यानंतर सकाळी पाणी पिण्याने शरीर हायड्रेट होते आणि डिटॉक्सिफिकेशन होण्यास मदत होते. त्यामुळे पोटावरील चरबीची समस्याही कमी होऊ लागते आणि शरीरातील चरबी जळते.

व्यायाम महत्वाचा

जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची असेल आणि चयापचय वाढवायचा असेल तर सकाळी व्यायाम करणे जास्त महत्वाचे आहे. चयापचय वाढल्याने चरबी जाळण्याची प्रक्रिया देखील दिवसभर जलद होते. चालणे, जॉग करणे किंवा हाय इंटेसिटी वर्कआउट, दररोज सकाळी अर्धा तास हलका आणि जास्त असे मिक्स व्यायाम करा.

प्रथिने आणि फायबर युक्त नाश्ता

घाईघाईत नाश्ता स्किप करु नका, तसेच अनहेल्दी नाश्ता देखील करू नका. अंडी, दही, स्मूदी यांसारखे प्रथिनेयुक्त पदार्थ खा. सर्व आवश्यक पौष्टिकतेने समृध्द नाश्ता घेणे महत्वाचे आहे. यामुळे चयापचय वाढते आणि रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित होते. पूर्णता आणि समाधानाची भावना देखील आहे.

माइंडफुल इटिंग महत्वाचे

खाण्याच्या बाबतीत सावध रहा आणि विचारपूर्वक खा. कोणते अन्न अनहेल्दी आहे आणि कोणते अन्न पौष्टिक आहे याचा विचार करूनच खा. शिवाय खाण्याच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणे देखील खूप महत्वाचे आहे. आरोग्यदायी पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले तरी लठ्ठपणा कमी होणार नाही. अन्न हळूहळू चावून आणि आस्वाद घेऊन खा.

तणाव दूर करण्यासाठी ध्यान करा

स्ट्रेस आणि तणावामुळे वजन वाढते. विशेषतः पोट आणि ओटीपोटाच्या जवळ. म्हणून तणाव दूर करण्यासाठी, आपल्या सकाळच्या रुटीनमध्ये ध्यानाचा समावेश करा. काही मिनिटे ध्यान केल्याने तणावासोबत हार्मोन्सही संतुलित राहतात. तसेच रोजच्या व्यायामाचा शरीरावर पूर्ण परिणाम होतो.

झोप महत्त्वाची

सकाळच्या या सर्व सवयींसोबतच रात्री ७-८ तासांची झोप घेणे खूप गरजेचे आहे. वजन आणि आरोग्य दोन्ही झोपेवर अवलंबून असते. त्यामुळे पूर्ण झोप घेणे गरजेचे आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)