Alia Bhatt Weight Loss After Pregnancy: आलिया भट्ट १५ मार्च रोजी तिचा ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. लग्नानंतर आणि आई बनल्यानंतर सध्या पूर्णपणे सक्रीय असलेली आलिया भट्ट चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. वर्कफ्रंट असो किंवा फॅमिली, सर्वत्र ती समतोल राखताना दिसते.मुलगी राहाच्या जन्मानंतर तिची फिगर ट्रान्सफॉर्मेशन सर्वांना आश्चर्यचकित करणारी होती.अवघ्या ४ महिन्यांत ती तिच्या जुन्या आकारात परत आली होती. आलिया भट्टने व्लॉगमध्ये शेअर सुद्धा केले होते की, ती तिचे वजन कसे कमी करत आहे.
मुलगी राहाच्या जन्मानंतर अवघ्या चार महिन्यांतच आलिया भट्ट तिच्या जुन्या शेपमध्ये परतली. यासाठी तिने खूप मेहनत घेतली होती.ज्याचा व्हिडिओही ती चाहत्यांसोबत शेअर करताना दिसली.
आलिया भट्टने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये ती एरियल योगा करताना दिसली. यासोबत तिने कॅप्शन लिहिले की, आई झाल्यानंतर ती पहिल्यांदाच प्रयत्न करत आहे.
प्रेग्नेंसीनंतर महिलांचे एब्डॉमिनल मसल्स कमकुवत होतात. अशा परिस्थितीत आलिया भट्टने सर्वात आधी आपले कोअर मजबूत केले. कोअर एक्सरसाइजच्या मदतीने ती तिची ताकद परत मिळवू शकली.
आलिया भट्टने सांगितले की, वर्कआउटच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात तिने ब्रीदिंग एक्सरसाइज आणि चालण्यावर लक्ष केंद्रित केले. जेणेकरून शरीराचा समतोल राखला जाईल.
सूर्यनमस्कार हा निरोगी राहण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. याशिवाय ते शरीराला लवचिक बनवते. आलिया भट्टची ट्रेनर अनुष्का परवानी हिने शेअर केले होते की ती १०८ सूर्यनमस्कार करते. त्यामुळे शरीराचे पोश्चर आणि लवचिकता सुधारते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)