Fitness Mantra: नेहमी थकवा आणि अशक्तपणा जाणवतो? एनर्जी लेव्हल वाढवण्यासाठी फॉलो करा या गोष्टी-fitness mantra do you always feel tired and weak then follow these things to increase energy level ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Fitness Mantra: नेहमी थकवा आणि अशक्तपणा जाणवतो? एनर्जी लेव्हल वाढवण्यासाठी फॉलो करा या गोष्टी

Fitness Mantra: नेहमी थकवा आणि अशक्तपणा जाणवतो? एनर्जी लेव्हल वाढवण्यासाठी फॉलो करा या गोष्टी

Mar 18, 2024 08:59 AM IST

Ways to Boost Energy: बरेच लोक तक्रार करतात की त्यांना नेहमी थकवा आणि शरीरात अशक्तपणा जाणवतो. तुम्हालाही हा त्रास असेल तर तुमची उर्जा पातळी वाढवण्यासाठी तुम्ही या ५ गोष्टी फॉलो करू शकता.

एनर्जी लेव्हल वाढवण्यासाठी करावयाच्या गोष्टी
एनर्जी लेव्हल वाढवण्यासाठी करावयाच्या गोष्टी (unsplash)

Things to Do to Increase Energy Level: काही लोक नेहमी थकलेले दिसतात आणि ते नेहमी अशक्तपणा अनुभवतात. कधी कधी याचे कारण काही आजार असू शकतात. बहुतेक प्रकरणांमध्ये हे काही चुकांमुळे होते. जर तुम्हालाही अचानक थकवा जाणवत असेल आणि अशक्तपणा जाणवत असेल तर येथे काही पद्धती आहेत ज्या फॉलो करून तुम्हाला लगेच उत्साही वाटू लागेल. चला तर मग जाणून घ्या आपली एनर्जी लेव्हल वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे.

समस्या निर्माण करणाऱ्या गोष्टी खाणे टाळा

काही पदार्थांमुळे पचन आणि ऊर्जा या दोन्हींमध्ये समस्या निर्माण होतात. अतिरिक्त साखरेसारखे पदार्थ ऊर्जा पातळी कमी करू शकतात. याशिवाय ज्या गोष्टी पचायला बराच वेळ लागतो त्या खाणे टाळले पाहिदे. कारण यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो.

अल्कोहोल टाळा

अल्कोहोल झोपेच्या गुणवत्तेवर आणि उर्जेच्या पातळीवर परिणाम करते. अल्कोहोल पिण्याच्या दरम्यान आणि नंतर तुम्हाला झोप किंवा चिडचिड वाटू शकते. जास्त मद्यपान केल्याने डिहायड्रेशन होऊ शकते

तणाव दूर करा

तणावामुळे थकवा येऊ शकतो. अशा परिस्थितीत दररोज तणावमुक्तीचा सराव करा. हे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. तणाव कमी करण्यासाठी ध्यान करा, कोमट पाण्याने आंघोळ करा, लव्हेंडर सारखे इसेंशियल ऑइल वापरा, पाय किंवा हातांना मसाज करा, हलका व्यायाम करा.

दररोज व्यायाम करा

निरोगी राहण्यासाठी व्यायामाचे अनेक फायदे आहेत.दररोज शारीरिक व्यायाम केल्याने कालांतराने ऊर्जा पातळी देखील वाढू शकते.दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम केला पाहिजे.

जास्त पाणी प्या

जे लोक कमी पाणी पितात त्यांना ऊर्जेची कमतरता जाणवू शकते. अशा स्थितीत डिहायड्रेशनच्या लक्षणांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. एनर्जेटिक राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे महत्त्वाचे आहे. यासाठी दिवसातून किमान आठ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner