जुई गडकरी अन् ईशा केसकरच्या मालिकेने घेतली झेप; तेजश्री प्रधान राहिली मागे! पाहा या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  जुई गडकरी अन् ईशा केसकरच्या मालिकेने घेतली झेप; तेजश्री प्रधान राहिली मागे! पाहा या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट

जुई गडकरी अन् ईशा केसकरच्या मालिकेने घेतली झेप; तेजश्री प्रधान राहिली मागे! पाहा या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट

Apr 26, 2024 08:37 AM IST

एकीकडे नव्या मालिका धुमाकूळ घालत असतानाच आता पुन्हा एकदा जुन्या मालिका टीआरपीमध्ये आपला दबदबा कायम ठेवून आहेत.

जुई गडकरी अन् ईशा केसकरच्या मालिकेने घेतली झेप; तेजश्री प्रधान राहिली मागे! पाहा या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट
जुई गडकरी अन् ईशा केसकरच्या मालिकेने घेतली झेप; तेजश्री प्रधान राहिली मागे! पाहा या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट

नुकताच १६व्या आठवड्याचा मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट नुकताच समोर आला आहे. यावेळच्या टीआरपी शर्यतीतही जुई गडकरी हिची ‘ठरलं तर मग’ ही मालिका टॉप ५मध्ये पहिल्या स्थानावर आहे. छोट्या पडद्यावर मालिकांचा दबदबा पाहायला मिळत आहे. एकीकडे नव्या मालिका धुमाकूळ घालत असतानाच आता पुन्हा एकदा जुन्या मालिका टीआरपीमध्ये आपला दबदबा कायम ठेवून आहेत. नुकताच १६व्या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे आणि यात कोणत्या मालिकांनी बाजी मारली, ते देखील दिसत आहे. चला तर बघूया या आठवड्याच्या ‘टॉप ५’ मालिका कोणत्या आहेत...

ठरलं तर मग (टीआरपी रेटिंग: ६.७)

‘ठरलं तर मग’ या मालिकेत सध्या अर्जुन आणि सायली यांची लव्हस्टोरी पाहायला मिळत आहे. करार म्हणून लग्न करणारे सायली आणि अर्जुन आता एकमेकांच्या प्रेमात पडले आहे. लवकरच या दोघांचं लग्न खऱ्या अर्थाने सफल होताना पाहायला मिळणार आहे. मालिकेतील या नव्या वळणामुळे ती प्रेक्षकांच्या पसंत उतरली आहे. ‘ठरलं तर मग’ ही मालिका नेहमीप्रमाणे टीआरपी शर्यतीत पहिल्या नंबरवर आहे.

लक्ष्मीच्या पाऊलांनी (टीआरपी रेटिंग: ६.४)

टीआरपी शर्यती ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही नवी मालिका सध्या चांगली गाजत आहे. या मालिकेने दुसरे स्थान पटकावत अनेक मालिकांना धोबीपछाड दिला आहे. कला आणि अद्वैतची गोष्ट सांगणारी ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे. या मालिकेत आता कला आणि अद्वैत यांची देखील जवळीक निर्माण होताना पाहायला मिळणार आहे. सध्या एकमेकांशी भांडणाऱ्या कला आणि अद्वैतचे पुढे काय होणार? याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. सध्या ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे.

अभिरामशी लग्न मोडण्यासाठी दुर्गा करणार लीलाला मदत! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये आज काय घडणार?

प्रेमाची गोष्ट (टीआरपी रेटिंग: ६.२)

कार्तिकने लावलेला आरोपांमुळे आता मुक्ताने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. आता ती सईला घेऊन सागरपासून वेगळी राहत आहे. तर, मुक्ता ही निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी सागर देखील अनेक प्रयत्न करत आहे. मात्र, मुक्ताला निर्दोष सिद्ध करताना सागर कार्तिकची बाजू घेऊन सगळ्यांशी भांडताना दिसतोय. हा सागरचा प्लॅन असून, लवकरच मुक्ता निर्दोष असल्याचे सगळ्यांसमोर येणार आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने टीआरपी शर्यती तिसरं स्थान पटकावला आहे.

तुझेच मी गीत गात आहे (टीआरपी रेटिंग: ६.०)

‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत मंजुळाने तीच वैदेही असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे स्वराला तिची आई पुन्हा मिळाली आहे. तर, मल्हारला देखील त्याचं पहिलं प्रेम परत मिळालं आहे. आता मल्हार वैदहीशी लग्न करून तिच्याशी संसार थाटण्याचा विचार करत असतानाच, मोनिका वैदहीचा जीव घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आता मल्हार आणि वैदही एकत्र येणार की, कायमचे दुरावणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुर झाले आहेत. ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत चौथ्या स्थानावर आहे.

सुख म्हणजे नक्की काय असतं (टीआरपी रेटिंग: ५.४)

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत आता गौरी आणि जयदीप म्हणजेच नित्या आणि अधिराज माईंसोबत मिळून शालिनीला धडा शिकवताना दिसणार आहेत. या जन्मातही गौरीला जयदीपचं प्रेम मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. मात्र, यावेळी ही लढाई आपणच जिंकू असा विश्वास गौरीला आहे. तर, यात तिला माई आणि जयदीपची देखील साथ मिळणार आहे. या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत पाचवे स्थान पटकावले आहे.

Whats_app_banner