‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात चैतन्य गडकरी, अर्जुन आणि सायली यांच्या कुटुंबाला एक मोठा धक्का देताना बघायला मिळणार आहे. एकीकडे अर्जुन चैतन्यला साक्षीबद्दल खरं सांगून त्याला तिच्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर, साक्षीच्या खोटेपणामुळे अर्जुनने आधीच त्याचा एक मित्र गमावला आहे. आता अर्जुनला त्याचा दुसरा मित्र मात्र गमवायचा नाहीये. म्हणूनच, अर्जुन चैतन्याला सांगण्यासाठी धडपड करत आहे. मात्र, चैतन्य त्याचं काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. अर्जुन साक्षीच्या विरोधात बोलतोय, हे कळल्यानंतरच चैतन्यने त्याला धुडकावून लावले आहे. इतकंच नाही तर, आपल्या आयुष्यातला एक मोठा निर्णय घेत आता चैतन्य सुभेदार परिवाराला जबरदस्त धक्का देणार आहे.
सुभेदार कुटुंब आनंदाने डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत असताना, आता त्यांच्या घरात चैतन्याची एन्ट्री होणार आहे. घरात आलेला चैतन्य सुभेदार कुटुंबाशी प्रेमाने बोलताना दिसणार आहे. यावेळी तो बोलणार आहे की,‘केवळ अर्जुनच नाही तर, तुम्ही पूर्ण कुटुंब माझ्या आयुष्याच्या एक महत्त्वाचा भाग आहात. तुमच्याशिवाय मी आयुष्यातला कुठलाच प्रवास सुरू करू शकत नाही. मात्र, आता मी माझ्या आयुष्यात एक नवीन प्रवास सुरू करण्याचा निश्चय केला आहे आणि त्या दिशेने मी माझं पहिलं पाऊल टाकत आहे. तो तुमच्या आशीर्वादाशिवाय सुरू होऊ शकत नाही. म्हणून या प्रवासात तुम्ही मला साथ द्याल, अशी माझी अपेक्षा आहे. मी आणि साक्षी आता लवकरच साखरपुडा करणार असून, यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे’.
साखरपुड्याची बातमी देऊन चैतन्य सगळ्या सुभेदारांना हादरवून टाकणार आहे. चैतन्यचा हा निर्णय ऐकल्यानंतर आता सायली आणि अर्जुनला देखील मोठा धक्का बसणार आहे. एकीकडे दोघेही चैतन्यला साक्षीच्या तावडीतून वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच, आता चैतन्यने घेतलेला हा मोठा निर्णय ऐकून दोघांनाही मोठे टेन्शन येणार आहे. आपल्या मित्राला साक्षीचा खरा चेहरा दाखवून तिच्यापासून दूर करण्याचा सायली आणि अर्जुनचा प्रामाणिक प्रयत्न आता यशस्वी होणार की, नाही हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.
मात्र, त्याआधी चैतन्यचा हा निर्णय ऐकून केवळ अर्जुन आणि सायलीच नव्हे, तर प्रेक्षकांना देखील धक्का बसणार आहे. आता लवकरच या मालिकेत चैतन्य आणि साक्षीच्या साखरपुड्याची लगबग सुरू झालेली पाहायला मिळणार आहे. चैतन्य एका गुन्हेगाराच्या मुलीशी लग्न करण्याची स्वप्न बघतोय, हे कळल्यानंतरच सुभेदारांना त्याचा राग आला आहे. आता मालिकेत पुढे काय घडणार, हे येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या