मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  प्रेम विवाह म्हणजे प्रेम नाही! नात्यांचा उलगडा करणारा मराठी चित्रपट ‘प्रेमम’ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

प्रेम विवाह म्हणजे प्रेम नाही! नात्यांचा उलगडा करणारा मराठी चित्रपट ‘प्रेमम’ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 25, 2024 04:11 PM IST

धर्म,जात यांच्या नावाखाली स्वतःसह दुसऱ्याच्याही आयुष्याची राखरांगोळी करणाऱ्या तरुणांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालून, त्यांना खऱ्या प्रेमाची ओळख करून देण्याचा प्रयत्न ‘प्रेमम’ या चित्रपटातून करण्यात आला आहे.

प्रेम विवाह म्हणजे प्रेम नाही! नात्यांचा उलगडा करणारा मराठी चित्रपट ‘प्रेमम’ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
प्रेम विवाह म्हणजे प्रेम नाही! नात्यांचा उलगडा करणारा मराठी चित्रपट ‘प्रेमम’ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या मराठी मनोरंजन विश्वात वेगवेगळ्या विषयावरचे कथानक पाहायला मिळत आहेत. अशातच आता आणखी एक एका कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. धर्म,जात यांच्या नावाखाली स्वतःसह दुसऱ्याच्याही आयुष्याची राखरांगोळी करणाऱ्या तरुणांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालून, त्यांना खऱ्या प्रेमाची ओळख करून देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.‘प्रेमम्’ असे या चित्रपटाचे नाव आहे. भविष्यातील खरी ताकद असलेल्या तरुण पिढीचा डळमळीत होणारा आत्मविश्वास पुन्हा मिळवून देणारा, परिपूर्ण फॅमिली एंटरटेनमेंट असलेला हा चित्रपट आपल्याला कुटुंबासोबत बघण्याचा आनंद घेता येणार आहे.‘प्रेमम्’या चित्रपटाचा पोस्टर लाँच सोहळा नुकताच या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित राव नरसिंगे यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडला. नुकतेच त्यांनी या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या पोस्टरमध्ये अभिनेता रोहित राव नरसिंगे आणि अभिनेत्री चैताली चव्हाण झळकले आहेत. या चित्रपटाचे पोस्टर पाहता हा चित्रपट उत्कंठावर्धक असणार आहे, याची प्रचिती येते. एम.आर.जोकर एंटरटेनमेंट एलएलपी प्रस्तुत आणि गोल्डन स्ट्राईप्स एंटरटेनमेंट एलएलपी निर्मिति'प्रेमम्’हा चित्रपट येत्या २९ नोव्हेंबर २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

महेश मांजरेकर यांना कशी सुचली ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाची कथा? काय म्हणाले अभिनेते वाचाच...

कधी सुरू होणार चित्रीकरण?

अभिनेता-दिग्दर्शक रोहित राव नरसिंगे‘प्रेमम्’ या चित्रपटाच्या पोस्टरविषयी बोलताना म्हणाला की, ’प्रेम म्हणजे नेमके काय आणि प्रेम विवाह म्हणजे काय यातील फरक दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. कॅप्टन फैरोज अन्वर माजगावकर,महादेव अशोक चाकणकर आणि आदित्य देशमुख यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मी स्वतः केलं असून कथा, संवाद देखील मी लिहिले आहेत. प्रथेप्रमाणे एखाद्या चित्रपटाचा मुहूर्त सिनेक्षेत्रातील नामांकित मंडळी,राजकारणी अथवा इतर मान्यवरांच्या हस्ते केला जातो. मात्र, या चित्रपटाच्या टीमने अशा पारंपरिक प्रथेला बगल देत, एक वेगळाच पायंडा पाडला आहे.‘प्रेमम्’चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त १० जून २०२४ रोजी होणार असून, पहिल्यांदाच अभिनेत्रीच्या वडिलांच्या म्हणजेच विजय सुखलाल चव्हाण यांच्या हस्ते नारळ वाढवून हा क्षण साजरा करण्यात येणार आहे.’

अभिनेता पुढे म्हणाला की,अभिनेता रोहित राव नरसिंगे,साहिल कुमार,शशिकांत ठोसर आणि अभिनेत्री चैताली विजय चव्हाण व केतकी पायगुडे हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिका साकरत असून,फैरोज अन्वर माजगवकर यांचा अभिनय देखील चित्रपटात पाहायला मिळणार आहे. गीतकार डॉ. विनायक पवार यांच्या लेखणीतून सजलेल्या गाण्यांना सनी-सुशांत यांनी संगीत दिलं आहे. गायक अरिजित सिंह,श्रेया घोषाल,जावेद अली या सारख्या गायकांच्या विविधांगी आवाजांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभणार आहे. बाल कलाकार आदिन माजगावकर यांच्या खुमासदार अभिनयाची झलक यातून पाहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग