मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अभिनेत्री तमन्ना भाटिया कायद्याच्या कचाट्यात अडकणार? पोलिसांनी पाठवले समन्स; नेमकं प्रकरण काय?

अभिनेत्री तमन्ना भाटिया कायद्याच्या कचाट्यात अडकणार? पोलिसांनी पाठवले समन्स; नेमकं प्रकरण काय?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 25, 2024 01:29 PM IST

महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला देखील समन्स पाठवले आहेत. म्हणजेच आता या अभिनेत्रीला एका मोठ्या प्रकरणात महाराष्ट्र सायबर पोलिसांसमोर हजर व्हावे लागणार असून, त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरेही द्यावी लागणार आहेत.

अभिनेत्री तमन्ना भाटिया कायद्याच्या कचाट्यात अडकणार? पोलिसांनी पाठवले समन्स; नेमकं प्रकरण काय?
अभिनेत्री तमन्ना भाटिया कायद्याच्या कचाट्यात अडकणार? पोलिसांनी पाठवले समन्स; नेमकं प्रकरण काय? (Instagram/@tamannaahspeaks)

'वायकॉम १८' ग्रुपच्या प्रसारण अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या महादेव बेटिंग ॲपच्या फेअरप्ले ऍप्लिकेशनवर इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल २०२३च्या सामन्यांच्या बेकायदेशीर स्ट्रीमिंगच्या संदर्भात अभिनेत्री तमन्ना भाटियाला महाराष्ट्र सायबर विभागाने चौकशीसाठी बोलावले आहे. फेअरप्ले सट्टेबाजी ॲपवर आयपीएल सामने पाहण्यासाठीची जाहिरात केल्याबद्दल समन्स बजावण्यात आलेल्या 'बाहुबली' फेम प्रसिद्ध अभिनेत्रीला २९ एप्रिल रोजी सायबर सेलसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास आणि साक्षीदार म्हणून तिचा जबाब नोंदवण्यास सांगण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या प्रकरणात संजय दत्तचे नावही समोर आल्याचे कळते आहे. त्याला या आठवड्याच्या सुरुवातीला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, त्याच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तो हजर राहू शकला नाही आणि त्याने नवीन तारीख मागितली. मीडिया रिपोर्टनुसार, बेकायदेशीर स्ट्रीमिंगमुळे वायकॉमचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यापूर्वी, बॉलिवूड गायक आणि रॅपर बादशाह आणि अभिनेता संजय दत्त यासोबतच जॅकलिन फर्नांडिस यांच्या व्यवस्थापकांचीही महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सट्टेबाजी ॲपची जाहिरात केल्याबद्दल आणि क्रिकेट सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना ॲपवर ट्यून इन करण्याचे आवाहन केल्याबद्दल चौकशी केली होती.

प्रेमाचा विजय होणार! निशी आणि नीरजचं लग्न लागणार! 'सारं काही तिच्यासाठी'मध्ये येणार मोठं वळण

तमन्नाला हजर व्हावं लागणार!

दरम्यान, आता महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला देखील समन्स पाठवले आहेत. म्हणजेच आता या अभिनेत्रीला एका मोठ्या प्रकरणात महाराष्ट्र सायबर पोलिसांसमोर हजर व्हावे लागणार असून, त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरेही द्यावी लागणार आहेत. अभिनेत्री तमन्ना भाटियाला २९ एप्रिल रोजी महाराष्ट्र सायबरसमोर हजर व्हावे लागणार आहे. या तपासाच्या माध्यमातून, फेअर प्ले ॲपवर आयपीएल २०२३च्या बेकायदेशीर स्ट्रीमिंगबद्दल कलाकारांना आधीच माहिती होती की, नाही हे शोधण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत.

लीला आणि अभिरामच्या साखरपुड्यानंतर दुर्गा समोर येणार सत्य! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये आज काय घडणार?

प्रकरण काय आहे?

तमन्नाला समन्स बजावण्यात आल्याची ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीला का बोलावले जात आहे, याबाबत सर्वच संभ्रमात आहेत. त्याचवेळी, काही चाहत्यांना अभिनेत्रीची चिंता देखील लागून राहिली आहे. याशिवाय काही युजर्स अभिनेत्रीला सपोर्ट करत तिला पाठिंबा देताना दिसत आहेत. फेअर प्ले हे एक ॲप आहे, जिथे लोक ऑनलाइन बेटिंग करतात. आता या ॲपवर आयपीएलचे बेकायदेशीर स्ट्रीमिंगचे प्रकरण समोर आले आहे. डिजिटल पायरसीनंतर आता या ॲपची जाहिरात करणारे कलाकारही अडचणीत आले आहेत.

कायदेशीर अधिकार विकत न घेता, ते आर्थिक फायद्यासाठी वायकॉम १८ची सामग्री दाखवून आणि कंपनीचे नुकसान करत असल्याचा दावा करून या ॲप्सविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.

IPL_Entry_Point

विभाग