मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मराठी मनोरंजन विश्वातही ‘फिल्मफेअर’ पुरस्कारांचा कल्ला! कुणी मारली बाजी? पाहा विजेत्यांची यादी...

मराठी मनोरंजन विश्वातही ‘फिल्मफेअर’ पुरस्कारांचा कल्ला! कुणी मारली बाजी? पाहा विजेत्यांची यादी...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 19, 2024 02:57 PM IST

नुकताच मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा २०२४ हा कार्यक्रम पार पडला आहे. या पुरस्कार सोहळ्यात अनेक कलाकारांनी आणि चित्रपटांनी प्रेक्षकांची मन जिंकून पुरस्कार पटकावले आहेत.

मराठी मनोरंजन विश्वातही ‘फिल्मफेअर’ पुरस्कारांचा कल्ला! कुणी मारली बाजी? पाहा विजेत्यांची यादी...
मराठी मनोरंजन विश्वातही ‘फिल्मफेअर’ पुरस्कारांचा कल्ला! कुणी मारली बाजी? पाहा विजेत्यांची यादी...

मनोरंजन विश्वातील फिल्मफेअर पुरस्कार हा अतिशय प्रतिष्ठित पुरस्कारांच्या यादीत सामील आहे. एखादा पुरस्कार सोहळा म्हटला की, कलाकारांची मांदियाळी दिसते. वर्षभरात प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलेल्या, तसेच गाजलेल्या चित्रपट आणि कलाकारांचा या पुरस्कार सोहळ्यात गौरव केला जातो. नुकताच मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा २०२४ हा कार्यक्रम पार पडला आहे. या पुरस्कार सोहळ्यात अनेक कलाकारांनी आणि चित्रपटांनी प्रेक्षकांची मन जिंकून पुरस्कार पटकावले आहेत. मनोरंजन विश्व म्हटलं की, पुरस्कारांचे वेगळेच महत्त्व असते. त्यातही फिल्मफेअर पुरस्कार अतिशय मानाचा मानला जातो.

ट्रेंडिंग न्यूज

हिंदी मनोरंजन विश्वात फिल्मफेअर पुरस्काराबद्दल अनेक चर्चा असतात. मात्र, मराठीत काही काळापूर्वी या सोहळ्याच्या चर्चा बंद झाल्या होत्या. मात्र, अभिनेता रितेश देशमुख याने पुन्हा एकदा या सोहळ्याला ग्लॅमर मिळवून दिलं आणि पुन्हा एकदा या सोहळ्याची सुरुवात करून, त्याने मराठी कलाकारांसाठीही फिल्मफेअरचे दरवाजे उघडले. या पुरस्कार सोहळ्यात मिळणारी ती मानाची ‘ब्लॅक लेडी’ आपल्याकडे असावी, असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. नुकताच मराठी मनोरंजन विश्वात फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला आहे.

निवडणुकीच्या धामधुमीत रणवीर सिंह नरेंद्र मोदींविरोधात बोलला? ‘त्या’ Viral Video मागचं सत्य काय? वाचा

मराठी फिल्मफेअरचं ८वं वर्ष!

यंदाच्या ८व्या मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२४ या सोहळ्यात अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. या सोहळ्याला नवाजुद्दीन सिद्दिकी यांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती. यावर्षीच्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये ‘वाळवी’, ‘झिम्मा २’, ‘बाई पण भारी देवा’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली होती. आता या सोहळ्यात कोणी कोणता पुरस्कार पटकावला, याची यादी समोर आली आहे.

पाहा विजेत्यांची यादी:

सर्वोत्कृष्ट चित्रपट : आत्मपॅम्फ्लेट, बाईपण भारी देवा

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : आशिष बेंडे (आत्मपॅम्फ्लेट)

सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक) : बापल्योक, नाळ २

सर्वोत्कृष्ट अभिनेता : शशांक शेंडे (बापल्योक)

सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) : अंकुश चौधरी (महाराष्ट्र शाहीर)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : गौरी देशपांडे (श्यामची आई)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक): रोहिणी हट्टंगडी (बाईपण भारी देवा)

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : जितेंद्र जोशी (नाळ २), विठ्ठल काळे (बापल्योक)

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री : अनिता दाते (वाळवी), निर्मिती सावंत (झिम्मा २)

सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम : अजय-अतुल (महाराष्ट्र शाहीर)

सर्वोत्कृष्ट गायक : जयेश खरे, मयुर सुकाळे (महाराष्ट्र शाहीर)

सर्वोत्कृष्ट गायिका : नंदिनी श्रीकर (उनाड)

सर्वोत्कृष्ट कथा : आशिष बेंडे (आत्मपॅम्फ्लेट)

सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्ले : मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी (वाळवी)

सर्वोत्कृष्ट संवाद : परेश मोकाशी (आत्मपॅम्फ्लेट)

सर्वोत्कृष्ट साउंड डिझाइन : अनमोल भावे (घर बंदुक बिर्याणी)

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी : लॉरेन्स डीकुंचा (उनाड)

सर्वोत्कृष्ट संपादन : फैसल महाडिक, इम्रान महाडिक (आत्मपॅम्फ्लेट)

सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरुष : आशितोष गायकवाड (उनाड)

सर्वोत्कृष्ट पदार्पण स्त्री : प्रियदर्शिनी इंदलकर (फुलराणी)

सर्वोत्कृष्ट बालकलाकार : त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे (नाळ २)

जीवनगौरव पुरस्कार : सुहास जोशी

IPL_Entry_Point