चित्रपटसृष्टीमध्ये मानाचा समजला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे 'फिल्मफेअर.' गुजरातमधील गांधी नगर येथे ६९व्या फिल्मफेअर पुरस्कार २०२४चे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. अगदी थाटामाटात हा पुरस्का सोहळा पार पडला आहे. सध्या सोशल मीडियावर या सोहळ्यातील रणबीर कपूर आणि तृप्ती डिमरीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोघे रोमँटिक अंदाजात डान्स करताना दिसत आहे.
फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात कलाकार अनेक गाण्यावर डान्स करताना दिसतात. अॅनिमल या चित्रपटातील रणविजय व झोया अर्थात रणबीर कपूर व तृप्ती डिमरीने ‘पहले भी मैं’ या गाण्यावर रोमँटिक डान्स केला आहे. काही इन्स्टाग्राम अकाऊंट्सवर त्यांचा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
वाचा: '12वी फेल'ने मारली बाजी! या अभिनेत्रीला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात रणबीर कपूरला अॅनिमल चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तसेच सर्वोत्कृष्ट म्यूझिक अल्बम देखील अॅनिमल चित्रपटातील गाण्याला मिळाला. फिल्मफेअर अवॉर्ड शोमध्ये रणबीर व तृप्ती व्यतिरिक्त इतर कलाकार मंडळींनी धमाकेदार डान्स केला. वरुण धवन, करिश्मा कपूर, करीना कपूर, आलिया भट्ट, मृणाल ठाकूर, कार्तिक आर्यन अशा अनेक कलाकारांनी जबरदस्त डान्स केला. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.