मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  प्रेमाचा विजय होणार! निशी आणि नीरजचं लग्न लागणार! 'सारं काही तिच्यासाठी'मध्ये येणार मोठं वळण

प्रेमाचा विजय होणार! निशी आणि नीरजचं लग्न लागणार! 'सारं काही तिच्यासाठी'मध्ये येणार मोठं वळण

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 25, 2024 12:42 PM IST

निशी आणि नीरजच्या प्रेमाला घरातून बराच विरोध झाला. मात्र, या विरोधापुढे देखील दोघांचे प्रेम टिकून राहीले आणि यामुळेच त्यांच्या प्रेमाचा विजय झाला असून, लवकरच मालिकेत या दोघांचं लग्न पाहायला मिळणार आहे.

प्रेमाचा विजय होणार! निशी आणि नीरजचं लग्न लागणार! 'सारं काही तिच्यासाठी'मध्ये येणार मोठं वळण
प्रेमाचा विजय होणार! निशी आणि नीरजचं लग्न लागणार! 'सारं काही तिच्यासाठी'मध्ये येणार मोठं वळण

छोट्या पडद्यावर काही महिन्यांपूर्वीच ‘सारं काही तिच्यासाठी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. दोन बहिणींच्या आयुष्यावर बेतलेली ही कथा आता त्यांच्या मुलींच्या आयुष्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. कोकणातील एका गावात राहणाऱ्या या दोन बहिणींच्या आयुष्यात एकदा असे वादळ येते की, त्या दोघी एकमेकांपासून दुरावतात आणि वेगवेगळ्या देशात जाऊन राहतात. मोठी बहीण आई-वडिलांची काळजी घेत कोकणातच रमते. तर, लहान बहीण मात्र मोठ्या बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत लग्न करून थेट परदेशात जाऊन राहू लागते. मात्र, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर दोन्ही बहिणींना एकमेकींची आठवण येते.

ट्रेंडिंग न्यूज

मोठ्या बहिणीची भेट घेतानाच लहान बहीण जीव सोडते. मात्र, जाता जाता मोठ्या बहिणीकडून आपल्या मुलीला सांभाळण्याचा वचन घेऊन जाते. मोठी बहीण उमा आता लहान बहीण संध्याचे वचन पूर्ण करण्यासाठी तिच्या मुलीला भारतात घेऊन येते आणि तिचा आपल्या मुलीप्रमाणे सांभाळ करते. या सगळ्यात एका आईची दोन मुलींसाठी होणारी धडपड या मालिकेतून सध्या पाहायला मिळत आहे. उमाच्या या दोन्ही मुली आता लग्नाला आल्या आहेत. एकीकडे श्रीनू ओवीच्या प्रेमात पडला आहे. तर, दुसरीकडे निशी ही तिच्या बॅडमिंटन कोच नीरजच्या प्रेमात पडली आहे.

लीला आणि अभिरामच्या साखरपुड्यानंतर दुर्गा समोर येणार सत्य! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये आज काय घडणार?

मुलींसाठी खंबीरपणे उभी राहिली उमा!

मात्र, निशीचे बाबा म्हणजेच उमाचे पती हे गावचे खोत असल्याने त्यांचा दराराच वेगळा होता. याशिवाय तळकोकणातील घर असल्यामुळे मुलींच्या काही गोष्टींवर बंधन देखील होते. मात्र, उमाच्या पाठिंबामुळे निशीने ही बंधनं झुगारत बॅडमिंटनच्या विश्वात आपलं नाव कमवून दाखवलं. परंतु, निशी आणि नीरज यांच्या प्रेमाबद्दल कळतात खोतांच्या घरात मोठा राडा झाला होता. दोघांच्या प्रेमाला घरातून बराच विरोध झाला. मात्र, या विरोधापुढे देखील दोघांचे प्रेम टिकून राहीले आणि यामुळेच आता त्यांच्या प्रेमाचा विजय झाला असून, लवकरच मालिकेत या दोघांचं लग्न पाहायला मिळणार आहे.

श्रीनू साजरा करू शकेल का ओवीचा वाढदिवस?

दुसरीकडे, श्रीनूच्या हृदयात ओवी आहे याची कल्पना खोत कुटुंबाला नाही. पण, चारूच्या मनात श्रीनू भरलाय, हे ती मंजूशी बोलताना सतत त्याचा उल्लेख करते. दादाखोत सुद्धा चारूसाठी स्थळं बघत आहेत. सुरुवातीला चारूच्या वागण्याकडे फारसं लक्ष न देणारा श्रीनू आता सावध राहत आहे. त्यातून लालीसुद्धा मुद्दाम काही गोष्टी घडवून आणण्यासाठी धडपडते आहे. अशातच ओवीचा वाढदिवसही येणार आहे. चारुला एव्हाना दोघांच्या प्रेमाची कुणकुण लागलेली आहे. त्यामुळे ओवीचा वाढदिवस श्रीनूला साजरा करता येऊ नये, याच्यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. हे सगळं चालू असताना दुसरीकडे निशी आणि नीराजचे लग्न विधी सुरू होणार आहेत. खूप दिवसांनंतर खोतांच्या घरात एक मंगल कार्य पार पडत आहे, म्हणून सगळे आनंदात आहेत.

IPL_Entry_Point

विभाग