मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ऊसाचा रस अन् रोमँटिक डान्स; ‘ठरलं तर मग’ मालिकेत होणार सायली-अर्जुनच्या प्रेमाची बरसात!

ऊसाचा रस अन् रोमँटिक डान्स; ‘ठरलं तर मग’ मालिकेत होणार सायली-अर्जुनच्या प्रेमाची बरसात!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 24, 2024 12:52 PM IST

सायली अर्जुनला पंधरा मिनिटांच्या रोमँटिक डेटवर घेऊन गेली आहे. चैतन्य आणि साक्षीच्या प्रकरणामुळे अर्जुन सतत काळजीत असतो, हे पाहून सायलीने त्याच्यासाठी खास रोमँटिक डेट प्लॅन केली आहे.

ऊसाचा रस अन् रोमँटिक डान्स; ‘ठरलं तर मग’ मालिकेत होणार सायली-अर्जुनच्या प्रेमाची बरसात!
ऊसाचा रस अन् रोमँटिक डान्स; ‘ठरलं तर मग’ मालिकेत होणार सायली-अर्जुनच्या प्रेमाची बरसात!

ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात सायली आणि अर्जुन यांची रोमांटिक डेट पाहायला मिळणार आहे. कालच्या भागात आपण पाहिलं की, सायली अर्जुनला पंधरा मिनिटांच्या रोमँटिक डेटवर घेऊन गेली आहे. चैतन्य आणि साक्षीच्या प्रकरणामुळे अर्जुन सतत काळजीत असतो, हे पाहून सायलीने त्याच्यासाठी खास रोमँटिक डेट प्लॅन केली आहे. अर्जुन कामात व्यस्त असल्याने तो तिला म्हणाला की, माझ्याकडे फक्त पंधरा मिनिटे आहेत. तर, सायली देखील त्याला म्हणाली की, पंधरा मिनिटांच्या या वेळेतही मी तुमच्यासाठी खूप आनंदाचे क्षण जमा करू शकते. तुम्ही फक्त माझ्यासोबत चला. सायलीच्या या बोलण्यानेच फिदा झालेला अर्जुन एका पायावर तिच्यासोबत चालायला तयार झाला.

ट्रेंडिंग न्यूज

यानंतर सायलीने आपली स्कूटर काढली आणि अर्जुनला पाठीमागे बसवून ती एका पंधरा मिनिटांच्या शॉर्ट राईडवर निघाली. तर, आता दोघेही या पंधरा मिनिटांच्या रोमांटिक डेटमध्ये एकमेकांसोबत आनंदाचे क्षण घालवणार आहेत. सायली अर्जुनला कॉफी डेटवर नव्हे तर, ऊसाच्या रसाच्या डेटवर नेणार आहे. सायली अर्जुनला ऊसाचा रस प्यायला देणार आहे. यानंतर दोघांचा रोमँटिक डान्स देखील प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. अर्थात आता या सगळ्या गोष्टी खऱ्या खऱ्या घडतात की, सायलीच्या कल्पनेत, हे मात्र मालिकेच्या येणाऱ्या भागातच कळणार आहे. मात्र, सायली आणि अर्जुन यांचे हे बहरणारे प्रेम बघून सगळेच प्रेक्षक मनोमन आनंदून गेले आहेत.

तरुणाईचं हार्टबीट वाढवायला सज्ज झालीये शिवाली परब! 'हार्टबीट वाढणार हाय' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

अर्जुन-सायली पडणार एकमेकांच्या प्रेमात!

इतके दिवस केवळ कॉन्ट्रॅक्टसाठी एकत्र राहणारे सायली आणि अर्जुन आता खऱ्या अर्थानं एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. लवकरच हे दोघे एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली देऊन, नव्याने संसार सुरू करतील, अशी अपेक्षा सगळ्यांनाच आहे. केवळ मधुभाऊंना तुरुंगातून सोडवण्यासाठी सायलीने अर्जुनशी लग्नगाठ बांधली होती. या लग्नाच्या वेळी त्यांच्यात एक करार देखील झाला होता. त्यांच्या लग्नाचा हा करार आता संपत आला आहे. मात्र, हा करार संपत असतानाच अर्जुन आणि सायली एकमेकांच्या प्रेमात पडताना दिसणार आहे. सायलीने अर्जुनला प्रेमाविषयी थेट नव्हे, पण अनेकदा विचारण्याचा प्रयत्न केला.

देणार का प्रेमाची कबुली?

तर, अर्जुन याने देखील आपल्या मनातील भावना सायली अनेकदा बोलून दाखवल्या आहेत. मात्र, त्याने सायली झोपलेली असताना किंवा नशेत असताना आपल्या मनातील भावना सांगितल्या आहेत. त्यामुळे सायलीला त्याची काहीही कल्पनाच नाही. दुसरीकडे, आता तरी अर्जुन आपल्याला प्रेमाची कबुली देईल, या आशेने सायली त्याला सतत काही ना काही तरी विचारत आहे. मात्र, दोघेही एकमेकांकडे प्रेम कसे काय व्यक्त करायचे? याच विचारात अजूनही आहेत.

IPL_Entry_Point