‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या आजच्या भागात दुर्गा लीलाला मदत करण्याचं वचन देताना दिसणार आहे. अभिराम आणि लीलाचा साखरपुडा पार पडल्यानंतर चवताळलेली दुर्गा थेट लीलाच्या घरी पोहोचली होती. त्यानंतर दुर्गाने लीलाला धमकी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे लग्न माझ्या मनाविरुद्ध होतंय, मला या लग्नात काहीही इंटरेस्ट नाही, हे लग्न केलं तर माझं आयुष्य बरबाद होईल, असं म्हणत लीलानेच दुर्गाला सुनावले. लीला हे लग्न करायचं नाहीये, हे कळल्यानंतर आता दुर्गा मनोमन खुश झाली आहे. सुरुवातीपासूनच दुर्गाला लीला घरात यायला नको होती.
मात्र, आता लीलाला स्वतःच हे लग्न करायचं नाहीये, असं म्हटल्याने दुर्गाचा सगळ्यात मोठा अडथळा दूर झाला आहे. आता अभिरामला लीलापासून कसे लांब ठेवायचे आणि लीला-अभिरामचे लग्न कसे मोडायचे याचे नवे प्लॅनिंग दुर्गा करत आहे. ‘तुला अभिरामशी लग्न करायचं नाही ना, मग मी सांगेन तसंच वाग. कुठलाही प्रकारचा गोंधळ घालू नकोस’, असं म्हणून दुर्गा लीलाला मदत करण्याचं वचन देणार आहे. तर, आपल्याला अभिरामशी लग्न करावं लागणार नाही, हे लग्न मोडेल, या आनंदात आता लीला देखील खूप खुश झाली आहे. याच खुश होण्याच्या नादात आता लीला एजेला भेटायला जहागीरदारांच्या घरी पोहोचणार आहे.
लाल पुष्पगुच्छ घेऊन घरी पोहोचलेल्या लीला पाहून आता एजेदेखील वैतागणार आहे. दुसरीकडे, दुर्गाची चांगली घाबरगुंडी उडणार आहे. आता लीला अबिरामला सगळं प्लॅनिंग सांगते की काय, या भीतीने दुर्गाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. मात्र, लीला अभिरामला काहीही सांगत नाही. दुसरीकडे, साळुंके कालिंदीचा बदला घेण्यासाठी लीलाच्या घरी पोहोचला आहे. लग्नाची खरेदी करून आलोय, लीलासाठी साड्या आणल्या आहेत, असं म्हणत तो काही पिशव्या कालिंदीच्या हाती सोपवणार आहे. त्यासोबतच हे लग्न घर आहे, खर्चाला थोडेफार पैसे असावेत, असं म्हणत एक लाख रुपये कालिंदीच्या हाती देणार आहे.
मात्र, हा साळुंकेचा काहीतरी वेगळाच डाव आहे. कालिंदीने लीलाचा साखरपुडा अभिरामशी करून दिला आहे हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर, आता साळुंखे चांगलाच चिडला आहे. कालिंदीचा बदला घेण्यासाठी आता साळुंके स्वतःची वेगळी शक्कल वापरणार आहे. कालिंदीला पैशाची लालच दाखवून पुन्हा एकदा तिच्या हातातून पैसा काढून घेण्याचा प्रताप साळुंखे करणार आहे. यामागे त्याचा नक्की डाव काय आहे हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये कळणार आहे.