shiv sena ubt candidates : लोकसभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार जाहीर, सांगली राखली! नाशिकमध्ये नवा चेहरा
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  shiv sena ubt candidates : लोकसभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार जाहीर, सांगली राखली! नाशिकमध्ये नवा चेहरा

shiv sena ubt candidates : लोकसभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार जाहीर, सांगली राखली! नाशिकमध्ये नवा चेहरा

Mar 27, 2024 09:57 AM IST

Shiv Sena UBT Lok Sabha candidate list : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेची यादी जाहीर, सांगली राखली, नाशिकमध्ये नवा चेहरा
ठाकरेंच्या शिवसेनेची यादी जाहीर, सांगली राखली, नाशिकमध्ये नवा चेहरा

Shiv Sena UBT Lok Sabha Election Candidate list : शिवसेना (उद्धव बाळासाहे ठाकरे) पक्षानं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी १७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसनं दावा केलेला सांगली लोकसभा मतदारसंघ अखेर शिवसेनेनं राखला असून तिथं अपेक्षेप्रमाणे चंद्रहार पाटील मैदानात उतरणार आहेत. नाशिक लोकसभेला मात्र अनपेक्षित चेहरात देत ठाकरेंनी धक्का दिला आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उमेदवारांची ही यादी ट्वीट केली आहे. त्यात वादाचा विषय ठरलेल्या दक्षिण मध्य मुंबई, सांगली लोकसभा मतदारसंघासह एकूण १७ जागांचा समावेश आहे. बऱ्याच वाटाघाटीनंतर सांगली अखेर शिवसेनेनं राखली आहे. तर, काँग्रेसनं दावा केलेला दक्षिण मध्य मुंबई हा मतदारसंघही शिवसेनाच लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. तिथं अनिल देसाई यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. 

ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व १७ उमेदवार पुढीलप्रमाणे

बुलढाणा - नरेंद्र खेडेकर 

यवतमाळ वाशिम - संजय देशमुख

मावळ - संजोग वाघेरे-पाटील

सांगली - चंद्रहार पाटील

हिंगोली - नागेश पाटील-आष्टीकर

संभाजीनगर - चंद्रकांत खैरे

धाराशीव - ओमराजे निंबाळकर

शिर्डी - भाऊसाहेब वाघचौरे

नाशिक - राजाभाऊ वाजे

रायगड - अनंत गीते

सिंधुदुर्ग रत्नागिरी - विनायक राऊत

ठाणे - राजन विचारे

मुंबई ईशान्य - संजय दिना पाटील

मुंबई दक्षिण - अरविंद सावंत

मुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाई

मुंबई वायव्य - अमोल कीर्तीकर

परभणी - संजय जाधव

 हातकणंगलेसह काही मतदारसंघाचा निर्णय अद्याप नाही!

महाविकास आघाडीच्या जागावाटपात हातकणंगले लोकसभा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेकडं आहे. तिथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेनं व महाविकास आघाडीनं तिथं आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, शेट्टी हे महाविकास आघाडीत येणार असतील तरच त्यांना पाठिंबा देण्याचा विचार करू असं महाविकास आघाडीचं म्हणणं आहे. त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्यानं शिवसेनेनं तिथून उमेदवार जाहीर करणं टाळलं आहे.

कल्याणचा उमेदवार कोण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरेंकडून कोण लढणार हे जाहीर करण्यात आलेलं नाही. तिथं दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, नाव जाहीर करणं शिवसेनेनं टाळलं आहे. कल्याण लोकसभेत महायुतीमध्ये फारसं आलेबल नाही. सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेऊनच इथला उमेदवार उतरवण्याचा ठाकरे यांचा विचार असल्याचं बोललं जातं.

Whats_app_banner