महेंद्रसिंह धोनी आणि सीएसकेचे कट्टर चाहते अनेकदा विचित्र गोष्टी करताना दिसतात. पण आता एका चाहत्याने असा पराक्रम केला आहे की, जो ऐकून तुम्ही कपाळाला हात लावाल.
वास्तविक, सीएकेच्या एका चाहत्याने धोनीला पाहण्यासाठी चक्क ६४ हजार रुपये खर्च केले आहेत. ही माहिती खुद्द त्या चाहत्यानेच एका युट्यूब चॅनेलला दिली आहे.
त्या चाहत्याला सीएसकेच्या सामन्याचे तिकिट मिळू शकले. म्हणून त्याने ब्लॅकमध्ये तिकिट विकत घेतले. ब्लॅकमधील या एका तिकिटासाठी त्याला एवढी मोठी रक्कम मोजावी लागली.
चाहत्याने युट्यूब चॅनेलवर बोलताना सांगितले, की "मला तिकीट मिळू शकले नाही, म्हणून मी तिकिट ब्लॅकमध्ये खरेदी केले. यासाठी मला ६४ हजार रुपये द्यावे लागले आणि आता मला माझ्या मुलींची फी भरायची आहे, पण आम्हाला एमएस धोनीला एकदा तरी बघायचे होते."
या चाहत्याला आणि त्याच्या तीन मुलींना धोनीला खेळताना पाहायचे होते. आता त्यांची ही इच्छा पूर्ण झाली आहे. मात्र यासाठी त्याने आपल्या मुलीच्या शाळेची फीस कुर्बान केली. आता या घटनेचीच चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.
शाळेच्या फीच्या पैशांनी मॅच पाहणे, चुकीचे असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे, त्या व्यक्तीची मुलगी म्हणाली, "माझ्या वडिलांनी ही तिकिटे खरेदी करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. एमएस धोनी खेळायला आला तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला."
वडील आणि ३ मुलींची ही जोडी CSK टी-शर्ट घालून आली होती आणि CSK च्या समर्थनार्थ शिट्ट्याही वाजवल्या.
संबंधित बातम्या