IPL Records : शमी की सिराज? पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक षटकार कोणत्या गोलंदाजाने खाल्ले? संपूर्ण यादी पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL Records : शमी की सिराज? पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक षटकार कोणत्या गोलंदाजाने खाल्ले? संपूर्ण यादी पाहा

IPL Records : शमी की सिराज? पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक षटकार कोणत्या गोलंदाजाने खाल्ले? संपूर्ण यादी पाहा

Apr 12, 2024 04:11 PM IST

Mohammed Siraj Ipl 2024: टीम इंडियासाठी मोहम्मद सिराजचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. पण आयपीएलमध्ये त्याला त्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. यामुळे तो स्वतःचाच एक लाजिरवाणा विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे.

IPL Records : पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक षटकार कोणत्या गोलंदाजाने खाल्ले? यादीत शमी-सिराजचं नाव
IPL Records : पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक षटकार कोणत्या गोलंदाजाने खाल्ले? यादीत शमी-सिराजचं नाव

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजसाठी आयपीएल २०२४ हे एखाद्या वाईट स्वप्नासारखे ठरले आहे. आतापर्यंत ६ सामने खेळल्यानंतर सिराजने केवळ ४ विकेट घेतल्या आहेत. तसेच, त्याने १० पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा खर्च केल्या आहेत. सामन्याच्या कोणत्याही टप्प्यात सिराजने गोलंदाजी केली तरी फलंदाजांनी त्याला झोडपून काढले आहे.

विशेष म्हणजे, सिराज आता आयपीएल सामन्यातील पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक षटकार खाण्याचा स्वतःचा विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे. आम्ही तुम्हाला अशा टॉप-५ बॉलर्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी आयपीएलच्या एका मोसमात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक षटकार खाल्ले आहेत.

मोहम्मद सिराज- १० षटकार (२०२४)

मोहम्मद सिराजने आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत फक्त ६ सामने खेळले आहेत. या काळात त्याने केवळ पॉवरप्लेमध्ये १० षटकार खाल्ले आहेत. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात सिराजच्या गोलंदाजीवर पॉवरप्लेमध्ये ४ षटकार मारले गेले. इशान किशन आणि रोहित शर्माने त्याची धुलाई केली होती.

मोहम्मद शमी- ११ षटकार (२०२३)

मोहम्मद शमीने IPL २०२३ मध्ये शानदार गोलंदाजी केली होती. मोसमात सर्वाधिक विकेट्स घेत त्याने पर्पल कॅपही जिंकली होती. पण यानंतरही पॉवरप्लेमध्ये त्याच्याविरुद्ध अनेक धावा झाल्या. १६ सामन्यांत शमीने पॉवरप्ले ११ षटकार खाल्ले होते.

आवेश खान-१३ षटकार (२०१८)

वेगवान गोलंदाज आवेश खान २०१८ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. त्यावेळी तो फक्त ६ सामने खेळला. त्याने गोलंदाजीत १० पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. आयपीएल २०२२ मध्ये आवेशने पॉवरप्लेमध्ये १३ षटकार खाल्ले होते.

मनप्रीत सिंग गोनी- १३ षटकार (२००८)

मनप्रीत सिंग गोनी हा आयपीएल २००८ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा प्रमुख गोलंदाज होता. त्या मोसमानंतर त्याला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली पण तो अयशस्वी ठरला. पंजाबच्या या वेगवान गोलंदाजाने आयपीएलच्या पहिल्या सत्रातील पॉवरप्लेमध्ये १३ षटकार खाल्ले होते.

मोहम्मद सिराज- १७ षटकार (२०२२)

आयपीएल २०२३ मध्ये सिराजने चांगली गोलंदाजी केली, पण २०२२ मध्ये तो महागडा ठरला. सिराजला १५ सामन्यात केवळ ९ विकेट मिळाल्या. पॉवरप्लेमध्ये त्याने १७ षटकार खाल्ले. 

दरम्यान, आता चालू मोसमात आरसीबीचे ८ सामने बाकी असून सिराज स्वतःचाच विक्रम मोडू शकतो.

Whats_app_banner