(1 / 10)मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहने गुरुवारी (११ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध धडाकेबाज कामगिरी केली. त्याने ४ षटकांत २१ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. यासह बुमराह आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. बुमराहने आतापर्यंत ५ सामन्यांत १० बळी घेतले आहेत. पण बुमराहचा इकॉनॉमी रेट चहलपेक्षा चांगला आहे. बुमराहचा इकॉनॉमी रेट ५.९५ आहे