CSK vs KKR IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा २२ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या खेळला गेला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सीएसकेने ७ विकेट्सनी सहज विजय मिळवला.
दरम्यान, या सामन्यातील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत रविंद्र जडेजा चेपॉकवरील चाहत्यांची फिरकी घेतली आहे. हा मजेशीर व्हिडीओ चाहत्यांना खूपच आवडला आहे.
वास्तिवक, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना KKR संघाने २० षटकात ९ गडी गमावून केवळ १३७ धावा केल्या. म्हणजेच सीएसकेसमोर विजयासाठी केवळ १३८ धावांचे लक्ष्य होते. यानंतर सीएसकेचे सलामीवीर कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र यांनी चांगली सुरुवात करून दिली.
सीएसकेची पहिली विकेट रचिन रवींद्रच्या रूपाने पडली तोपर्यंत संघाची धावसंख्या २७ धावांवर पोहोचली होती. यानंतर कर्णधाराने डॅरिल मिशेलसोबत चांगली भागीदारी केली. डॅरिल मिशेल १९ चेंडूत २५ धावा करून बाद झाला. तेव्हा संघाची धावसंख्या ९७ धावांवर होती. चौथ्या क्रमांकावर आलेल्या शिवम दुबेनेही धारदार फटके खेळून आपल्या संघाला विजयाच्या दारात नेले.
दुबेने १८ चेंडूत २८ धावा केल्या. जेव्हा संघाची धावसंख्या १३५ धावा होती, म्हणजेच सीएसके विजयाच्या अगदी जवळ आली होती, तेव्हा दुबे बाद झाला. यानंतर एमएस धोनी फलंदाजीला येईल, अशी सर्वांना अपेक्षा होती.
पण रविंद्र जडेजा बॅट घेऊन फलंदाजीला निघाला, तो फलंदाजीला जात असल्याचे पाहून चाहत्यांनी जोरदार गोंधळ घातला. यानंतर काही पावले पुढे जात जडेजा माघारी फिरला आणि धोनी फलंदाजीसाठी गेला.
वास्तविक, जडेजाने फलंदाजीला जायचे फक्ट नाटक केले होते. त्याला चाहत्यांची रिअॅक्शन पाहायची होती. अशा प्रकारे जड्डूने चेपॉकवर आलेल्या धोनीच्या चाहत्यांसोबत प्रॅंक केला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
धोनीने या सामन्यात ३ चेंडू खेळले आणि एक धाव काढली. अर्धशतकी खेळी करणाऱ्या कर्णधार ऋतुराज गायकवाडने आपल्या संघाला विजयापर्यंत नेले. चेन्नईतच सीएसकेने पहिले दोन सामने जिंकले होते, पण यानंतरचे दोन सामने गमावले होते. आता सीएसकेची गाडी पुन्ही एकदा विजयी मार्गावर परतली आहे. चेन्नईने आतापर्यंत एकूण ५ सामने खेळले असून या ३ जिंकले आहेत आणि २ हरले आहेत.
संबंधित बातम्या